सकाळचा नाष्टा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे दररोज सकाळी नाष्टा अवश्य करावा. चुकूनही नाष्टा न करता घराबाहेर पडू नये, असे तज्ञांकडून सांगितले जाते. पण, नाष्टा करताना तुम्ही काय खाताय, याला सुद्धा महत्त्व आहे. सकाळचा नाष्टा विविध पोषक घटकांनी परिपूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सकाळी नाष्टामध्ये अनहेल्दी पदार्थ खाल्लेत तर याचा परिणाम तुमच्या गट हेल्थवर होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊयात, कोणते पदार्थ गट हेल्थवर परिणाम करणारे ठरू शकतात.
दुधाची चहा –
अनेकांची सकाळ चहाचा स्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. दुधाच्या चहामध्ये लॅक्टोज आणि कॅसिन आढळते . चहातील लॅक्टोज काही जणांना पचत नाही. ज्यामुळे दिवसभर गॅस, अपचन अशा त्रकारी जाणवतात. त्यामुळे सकाळी दुधाची चहा न घेता, कोरा चहा, ग्रीन टी प्यायला हवे.
फळांचा ज्यूस –
सकाळच्या नाष्टात फळांचा ज्सूस पिणे फायदेशीर मानले जातात. पण, फळांचा ज्यूस पिणे शरीरासाठी फायदेशीर असले तरी नाष्टात त्याचा समावेश करू नये. विशेष करून रिकाम्या पोटी फळांचा ज्यूस पिऊ नये. फळांचा ज्यूस रिकाम्या पोटी प्यायल्यास ज्यूस मधील साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवते. ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि जास्त भूक लागते. परिणामी, तुमचे वजन वाढू शकते.
ब्रेड –
रिकाम्या पोटी ब्रेडही खाऊ नये. ब्रेडमध्ये स्टार्च असते, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करते. ज्याच्या परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो.
मसालेदार पदार्थ –
अनेकांना सकाळी नाष्टांमध्ये चटपटीत पदार्थ खायला आवडतात. पण, असे पदार्थ खाणे शरीरासाठी योग्य नसते. असे चटपटीत, मसालेदार पदार्थ खाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे सकाळी मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, त्याऐवजी हेल्दी पदार्थ खावेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde