Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीHair Care Tips - कलर केल्याने केसांचा झाडू झालाय ? फॉलो...

Hair Care Tips – कलर केल्याने केसांचा झाडू झालाय ? फॉलो करा या टिप्स

Subscribe

केस सुंदर व आकर्षक दिसावे यासाठी बऱेचजण हेयर कलर म्हणजेच केसांना रंग देतात. पण या कलरमध्ये अनेक रासायनिक केमिकलचा वापर करण्यात आलेला असतो. यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हळूहळू केसांचा पोत खराब होऊन केसांचा अक्षरश झाडू होतो.

हेअर कलरमध्ये अमोनिया नावाचे केमिकल असते. जे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. ज्यावेळी केसांना कलर केले जाते त्यावेळी त्याचे क्युटीकल्स उघडले जातात. कलरचा केसांवर थर बसावा यासाठी केसांवर अनेक केमिकलचा मारा केला जातो. ज्यामुळे केस खराब होतात. हे टाळण्यासाठी
काय करायचे ते बघूया.

केसांना कलर केल्य़ावर तीन दिवस केस धुवू नयेत. त्यामुळे केसांची चकाकी कायम राहते. तसेच हेअर क्युटीकलमुळ होणारे नुकसानही टाळता येते.

कलर केलेल्या केसांवर फक्त प्रोटेक्टेंट शॅम्पू वापरावा. त्यामुळे केसांच्या त्वचेचा पीएच लेवल कायम राहतो.

केस धुताना नेहमी सामान्य पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याने केस निस्तेज, कोरडे तर होतातच शिवाय त्यांची मूळही कमकुवत होतात. तसेच केसांच्या क्युटिकल्सवरही त्याचा दुष्परिणाम होतो. थंडीत मात्र कोमट पाण्याने केस धुवावे.

केस धुतल्यानंतर त्यांना कंडीशनर लावावे. त्यामुळे केस मऊ आणि मुलायम राहतात. त्यामुळे केसांच्या क्युटिकल्समध्ये मायश्चरायझर लॉक होते. ज्यामुळे केस तुटत नाहीत.

हेअर स्टाईल करताना आपण बरेच टूल्स वापरतो. त्यात हेऊन स्ट्रेटनर ते करलिंग टूल्स प्रेसिंग टूल्सचा समावेश आहे. पण त्यामुळे केस तात्पुरते सेट होतात. पण त्यासाठी केसांवर गरम मशीन फिरवावी लागत असल्याने मूळ मात्र कमकुवत होतात. केस तुटू लागतात. हे टाळण्यासाठी हीटींग टुल्स ऐवजी सीरम किंवा माईल्ड स्प्रे वापरावा.

 

Manini