घरलाईफस्टाईलपावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

Subscribe

पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण सोबतच केसांची काळजी सुद्धा घ्या, या काही टिप्सचा वापर केला तर तुम्ही नक्कीच तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.

पावसाळा आला की अनेकांचे बाहेर फिरायला जाणायचे प्लॅन्स बनतात. तर काहींना पावसात मनसोक्त भिजायला आवडतं. पावसाळा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळयांनाच आवडतो. पण पावसात चिंब भिजताना केसांची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे असते. पावसाळ्यात मनसोक्त भिजताना काही वेळा अनेकांचं स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी घेणे सुद्धा खूप महत्वाचे असते. पावसाळयात केस गळतीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. पावसात भिजल्याने केस मुळांपासून कमकुवत होतात आणि त्यामुळे केस गाण्याची सुद्धा शक्यता असते. पावसाळ्यात केस गळती थांबविण्यासाठी काही उपाय केले तर त्याने हा त्रास कमी होऊ शकतो. कोणते आहेत ‘हे’ उपाय आणि टिप्स जाणून घेऊया.

पावसाळ्यात केस गाळण्याची समस्या सामान्य आहे पण असं असलं तरी पावसाळ्यात कमीत कमी हेअर प्रोडक्ट्सचा वापर करा असं तज्ज्ञांचं मत आहे.

- Advertisement -

 

हे ही वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

- Advertisement -

– टोपी किंवा स्कार्फ चा वापर

पावसाळ्यात घराबाहेर पडताना केस कव्हर करून (झाकून) बाहेर पडणं हे उत्तम. त्यासाठी टोपी किंवा स्कार्फचा वापर तुम्ही करू शकता. ज्यामुळे केस ओलसर होत नाहीत आणि त्यात धूळ जात नाही

 

– लांब केस नको

पावसाळ्यात जास्त केस वाढवू नयेत कारण केस भिजल्यावर ते गळू शकतात. शिवाय केसांमध्ये पाणी मुरून सर्दी किंवा खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास पावसाळ्यात केसांची लांबी कमी करावी.

हे ही वाचा – Beauty Tips : सुंदर नितळ त्वचेसाठी असा बनवा तांदळाचा फेसपॅक

– केस धुणे आवश्यक

पावसाळ्यात केस काहीजण ओले झालेलं केस कोरडे करून ते पुन्हा बांधून ठेवतात त्याने केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. त्यामुळे पावाच्या पाणयात केस भिजल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि पूर्णपणे कोरडे झाल्यावरच बांधावेत.

– कोरड्या शॅम्पूचा वापर

पावसाळ्यातर केस ओले झाल्यावर सर्वात आधी त्यातलं पाणी काढून ते कोरडे कसून घ्यावेत. आणि केसांवर ड्राय शॅम्पू स्प्रे करून स्वच्छ पाण्याने धुवावे

 

– सकस आहार घ्यावा

पावसाळ्यात योग्य आणि सकस आहार घेणे गरजेचे असते. तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणं टाळलं पाहिजे तेलकट पदार्थ खाल्ल्याने केसांवर त्याचा परिणाम होऊ शकतो

 

– चहा- कॉफीचं सेवन कमी करा

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ऑईल बेस सिरम वापरणं योग्य राहतं. याशिवाय केसांची १५ दिवसांतून एकदा डीप कंडिशनिंग सुद्धा करू शकता. त्याचसोबत चहा किंवा कॉफी सारखी कॅफेन युक्त पेय पिणे टाळा.

पावसाळ्यात भिजताना या काही टिप्सचा वापर केला तर तुम्ही नक्कीच तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. ज्याने तुमच्या केसांची कमी प्रमाणात हानी होईल.

हे ही वाचा – केतकी चितळेला दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -