घरलाईफस्टाईलअशी घ्या केसांची काळजी

अशी घ्या केसांची काळजी

Subscribe

केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी.

सध्याच्या घडीला सर्वच महिलांच्या केसांबाबत एक ना अनेक समस्या उद्भवत असतात. काही महिलांचे केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, यासर्व समस्यांवर एकच उपाच म्हणजे केसांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. चला तर जाणून घेऊया केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी.

तेलाचा मसाज

- Advertisement -

केस धुण्यापूर्वी केसांना तेलाने मसाज करणे फार गरजेचे आहे. याकरता खोबरेल तेल घेऊन ते थोडे कोमट करावे आणि त्या तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्तभिसरण सुधारते.

जास्त काळ तेल ठेऊ नये

- Advertisement -

डोक्यावर जास्तीत जास्त २४ तास तेल ठेवावे. त्याच्यापेक्षा अधिक काळ केसावर तेल ठेऊ नये. जास्त वेळ केसात तेल राहिल्याने केसात धूळ अडकून राहते आणि त्यामुळे केस दुर्बल होतात.

केस थंड पाण्याने धुवावे

केस धुताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करावा. गरम किंवा कोमट पाण्याचा सहजासहजी वापर करु नये. गरम पाण्याने केस धुतल्यास केस दुबळे आणि रखरखीत होतात. तसेच केस गळतीही होते.

केस तीन महिन्यातून कापावे

केस कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तरी कापावे. केस कापल्यामुळे केसांची रुक्ष टोके नष्ट होतात आणि निश्चितच त्यांना एक निरोगी लूक येतो.

मेंदीचा वापर करावा

केसांना मेंदी लावणे अतिशय चांगले असते. केसांना मेंदी लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे केसांना मेंदी लावावी.


हेही वाचा – पाणी कमी पिल्याने किडनी होईल फेल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -