Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyहेअर कलर मुळे केस ड्राय झालेत,मग करा हे उपाय

हेअर कलर मुळे केस ड्राय झालेत,मग करा हे उपाय

Subscribe

केस सुंदर दिसावेत म्हणून आपण काही प्रकारचे हेअर कलर अप्लाय करतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढले जाते. सध्या केस कलर करण्यासाठी काही प्रकारच्या केमिकल युक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. कलर केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर त्याचा वॉल्यूम कमी दिसण्यासह फ्रिजीनेस वाढला जातो. जर तुम्ही केसांची योग्य काळजी घेतली तर केसांचा रंग फिका पडणार नाही आणि केस हेल्दी राहतील. जाणून घेऊयात कलर हेअरची काळजी कशी घ्यायची याचबद्दलच्या खास टिप्स.

केसांना कलर केल्यानंतर या टिप्स फॉलो करणे विसरू नका
72 तासांपर्यंत केस धुवू नका
केसांना लावलेला रंग दीर्घकाळ टिकून रहावा म्हणून ते तीन दिवस तरी धुवू नका. यामुळे केसांची चमक कायम राहिल. या व्यतिरिक्त हेअर क्युटिकल्स डॅमेजही होत नाहीत. जर तुम्ही एखाद्या कारणास्तव केस धुवत असाल तर केसांचा टोन बिघडला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त केमिकल्सही निघून जातात.

- Advertisement -

केसांना कलर प्रोटेक्ट शॅम्पू वापरा
कलर प्रोटेक्ट शॅम्पूचा वापर करून तुम्ही केसांचा रंग दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता. अल्कोहोल आणि सल्फेट सारख्या हार्श केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केसांच्या टेक्चरला नुकसान पोहचू शकते. अशातच केसांचा रंग टिकून रहावा म्हणून योग्य शॅम्पूचा वापर करावा.

केसांना कडीशनिंग करणे गरजेचे
केस धुतल्यानंतर त्यावर कंडीशनर जरूर लावा. यामुळे केस स्मूद होतात. यामुळे क्युटिकल्समध्ये मॉइश्चर लॉक होते. अशातच केस तुटण्याच्या समस्येपासून तुम्ही दूर राहता. हेअरवॉश केल्यानंतर केस ग्लॉसी आणि हेल्दी होतात. यामुळे केसांना पोषण मिळते. ड्रायनेसपासून तुम्ही दूर राहता.

- Advertisement -

गरम पाण्याने धुण्यापासून दूर रहा
केस धुण्यासाठी नॉर्मल पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने केस धुतल्याने ते ड्राय आणि कमजोर होतात. या व्यतिरिक्त हेअर क्युटिकल्सवरही निगेटिव्ह परिणाम होतो. थंडीच्या दिवसात केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

हेअर टूल्सचा वापर करणे टाळा
केसांना कलर केल्यानंतर प्रेसिंग आणि करलिंग टूल्सचा वापर करणे टाळा. यामुळे केस डॅमेज होऊ शकतात. केसांना लावलेले केमिकल्स हिटच्या संपर्कात आले तर केस मूळांपासून कमजोर होऊ शकतात. जर तुम्हाला फ्रिजीनेसपासून दूर रहायचे असेल तर केसांवर हिटींग टूल्सऐवजी सीरम किंवा माइल्ड स्प्रेचा वापर करू शकता.


हेही वाचा- हेड मसाज करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

 

- Advertisment -

Manini