Saturday, April 20, 2024
घरमानिनीBeautyघरीच हेअर कलर करताय, मग Color shade अशी निवडा

घरीच हेअर कलर करताय, मग Color shade अशी निवडा

Subscribe

हेअर करलचा ट्रेंन्ड आता फार वाढला गेला आहे. लोक आपली पसंद आणि गरजेनुसार पर्मानेंट, सेमी पर्मानेंट. टेम्पररी हेअर कलर करतात. पार्लरमध्ये जाऊन हेयर कलर करण्यासाठी फार वेळ नसल्याने बहुतांश लोक घरच्या घरीच हेअर कलर करण्याचा ऑप्शन निवडतात. परंतु घरी हेअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच बद्दलच ब्युटी एक्सपर्ट काय सांगतात हे पाहूयात. (Hair color tips at home)

केसांना कलर करण्यापूर्वी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की,हेअर कलर मध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत आणि तो रंग केसांना लावल्यानंतर केसांना नुकसान तर होणार नाही ना हे पाहिल पाहिजे.

- Advertisement -

हेयर कलरमुळे होते केसांचे नुकसान
रेग्युलर आणि पर्मानेंट हेयर कलरमुळे केसांचा रंग बदलला जातो. केसांना रेग्युरलर कलर केल्याने केवळ क्युटिकल्सलाच नव्हे तर केस तुटतात आणि गळतात ही. त्याचसोबत केसांची चमक निघून जाते. केसांना कलर जर तुम्ही सेमी-पर्मानेंट कलर लावत असाल तर केस धुतल्यानंतर ते रंग 4-6 वॉश पर्यंत टिकून राहतो. सेमी पर्मानेंट हे पर्मानेंट हेअर कलरऐवढे नुकसानकारक नसतात.

Hair color tips at home
Hair color tips at home

अमोनिया फ्री कलर निवडा
जर तुम्हाला केसांना कलर करायचे असेल तर नेहमीच अनोनिया फ्री कलर निवडा. जर तुम्हाला एखाद्या खास फंक्शनसाठी हेअर कलर करायेच असतील तर मार्केटमध्ये हर्बल मस्कारा सारखे टेम्पररी कलर सहज उपलब्ध होतात. हे रंग तुम्ही हेअर वॉश करत नाहीत तो पर्यंत राहतो. सर्वसामान्यपणे तीन शेड्स- ब्राउनिश ब्लॅक, ब्राउन आणि बरगंडी फार पसंद केले जातात.

- Advertisement -

तुम्हाला नक्की कोणती शेड्स हवीयं?
केसांना रंग करण्यापूर्वी हा विचार करा की, तुमच्या केसांना कोणता रंग सूट होईल. तसेच टेम्पररी, पर्मानेंट की सेमी पर्मानेंट हेअर कलर करायचे आहे हे सुद्धा पहा. जर तुमचे केस ब्राउन असतील तर तुम्ही डार्क ब्राउन किंवा ब्लॅक कलर निवडू शकता. जर तुम्ही आधीच डार्क शेड लावली असेल तर लाइट शेड्स निवडत असाल तर तुम्हाला आधी केसांना ब्लीच करावे लागेल आणि त्यानंतर त्यावर लाइट शेड लावाली लागेल.(Hair color tips at home)

स्किन टोन नुसार निवडा हेयर कलर
केसांना कलर करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुमचा स्किन टोन पहा. असा हेअर कलर निवडा जो तुमच्या स्किन टोनला मॅच होईल. इंडियन स्किन टोनसाठी ब्राउन हा एक नैसर्गिक कलर बेस्ट मानला जातो. सर्वसामान्यपणे इंडियन स्किन टोनवर लाइट ब्राउन हा कलर सूट होत नाही. त्यामुळे तुमचा स्किन टोन उजळ असेल तर तुम्ही त्यापेक्षा उत्तम शेड्स निवडू शकता.


हेही वाचा- तुमच्या केसांचे ‘हे’ सीक्रेट्स सांगतील तुमच्या आरोग्याबद्दल अधिक

 

- Advertisment -

Manini