Wednesday, December 6, 2023
घरमानिनीBeautyकेस कुरळे करण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी

केस कुरळे करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

Subscribe

सुंदर आणि वॉल्यूम केस असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. आजकाल महिला केसांच्या विविध हेअरस्टाइल करतात. पण त्या हेअरस्टाइल करण्यासाठी हिटचा वापर करतात. यासाठी रोलरचा वापर केला जातो. परंतु यापूर्वी रोलरचा वापर केला जात नव्हता. वेळेअभावी महिला सध्या आयरन रोलरचा वापर करतात. मात्र तुम्हाला केसांचा वॉल्युम द्यायचा असेल तर रोलर एक बेस्ट ऑप्शन आहे.

सतत केसांना हिट दिल्याने ते डॅमेज होऊ शकतात. रोलरचा वापर तुमच्या केसांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. अशासाठी केस कुरळे करायची असतील तर हिट ऐवजी पुढील काही टीप्सची मदत घेऊ शकता.

- Advertisement -

हेअर रोलर वापरण्यापूर्वी केस स्वच्छ असावेत
जेव्हा केसांना हेअर रोलर लावाल तेव्हा काळजी घ्या की, तुमचे केस स्वच्छ असावेत. अस्वच्छ केसांवर कर्ल करण्याचा प्रयत्न करू नका. ते व्यवस्थितीत होणार नाहीत.

- Advertisement -

आता रेलर्सचा वापर करा
रोलर्सचा वापर करण्यासाठी सर्वात प्रथम केस लहान-लहान पार्टमध्ये विभागा. त्यानंतर केसांना खालून ते वरच्या दिशेने कर्ल्स करण्याचा प्रयत्न करा. अखेर रोल क्लिपला स्कॅल्पजवळ पिनअप करा. अशाप्रकारे केस रोल करा.

ऐवढा वेळ ठेवा रोलर
तुम्ही रोलर केसांवर किती वेळ ठेवता हे कर्ल्सवर अवलंबून असते. तुम्हाला कर्ल्स आणि केसांना अधिक वॉल्यूम हवा असेल तर केसांना रोलर 7-8 तास ठेवू शकता. जर केसांना हलके कर्ल करायचे असेल तर केवळ 3-4 तासच ठेवा.

रोलर अशा प्रकारे काढा
केसांवरील रोल आरामात काढा, जेणेकरुन ते खराब होणार नाही. त्यानंतर आपल्या बोटांनी कर्ल्सला हलके सैल करा आणि हेअर स्प्रे लावून केसांना सेट करा. तुमचे केस वेवी होतील आणि केसांना वॉल्यूम ही येईल.


हेही वाचा- लांबसडक केसांसाठी लावा द्राक्षांच्या बियांचे तेल

- Advertisment -

Manini