Thursday, December 7, 2023
घरमानिनीBeautyकेस गळतीवर रामबाण उपाय कढीपत्त्याचे तेल

केस गळतीवर रामबाण उपाय कढीपत्त्याचे तेल

Subscribe

आपल्या धावपळीच्या आयुष्याचा आपल्यावर आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यापैकीच एक म्हणजे केस गळतीची समस्या. ही समस्या बहुतांश महिलांना होते. केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी विविध उपाय केले जातात. अशातच तुम्ही घरगुती पद्धतीने कढीपत्त्याचे तेल तयार करून केस गळतीच्या समस्येपासून दूर राहू शकता.

खरंतर प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन युक्त कढीपत्ता हेअर फॉलसाठी मदत करू शकतात. कढीपत्ता तुमचे केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी त्याची ग्रोथ करण्यास ही मदत करतो. त्याचसोबत कढीपत्त्यात अँन्टीऑक्सिडेंट्स असतात जे स्कॅल्प आणि डेड स्किन तयार होऊ देत नाही.

- Advertisement -

 

- Advertisement -

घरच्या घरी असे बनवा कढीपत्त्याचे तेल
यासाठी तुम्ही एक बाउल कढीपत्ता आणि एक कप नारळाचे तेल घ्या. सर्वात प्रथम तेल गरम करून घ्या आणि त्यात कढीपत्त्याची पाने टाका. जो पर्यंत कढीपत्त्याची पाने त्यात गरम होत नाही तो पर्यंत तसचे राहू द्या. त्यानंतर तेल गाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवा.

कढीपत्ता केसांना लावल्याने होणारा फायदा
-कढीपत्त्याचे तेल दररोज केसांना लावले तर केसांना पोषण मिळते. त्याचसोबत ते मूळापासून मजबूत होतात
-केस सफेद होण्यापासून दूर राहता
-कढीपत्त्याच्या तेलाने केसांना मसाज केल्यास ब्लड सर्कुलेशन सुधारते
-केसांची ग्रोथ होते
-जर तुम्ही ड्राय केसांच्या समस्येचा सामना करत असाल तर कढीपत्त्याचे तेल वापरू शकता


हेही वाचा- केस कुरळे करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini