गरजेचे नाही की, सर्व महिलांना एकसारखी लक्षणे दिसत नाही. काही महिलांमध्ये मेनोपॉजचा फेज सुरु झाल्यानंतर केस गळण्याची समस्या सुरु होऊ लागते. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, अर्ध्या पेक्षा अधिक महिलांना जेव्हा मेनोपॉज सुरु होतो तेव्हा त्यांचे केस गळणे सुरु होते. काही महिलांचे केस खुप पातळ होतात. तर काही महिलांमध्ये एलोपीसियाची समस्या निर्माण होते.
डॉक्टर असे म्हणतात की, मेनोपॉजची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एका महिलेला कमीत कमी 12 महिने सातत्याने पीरियड्स येत नाहीत. केस गळण्यामागील कारण म्हणजे हार्मोनल बदल. हा मेनोपॉज फेजच्या सुरुवातीच्या काही वर्षाआधी सुरु होऊ शकतो. मेनोपॉजची फेज पूर्ण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या दीर्घकाळ राहू शकते.
मेनोपॉजच्या कारणास्चव केस गळण्याची समस्या शरीरातील अन्य ठिकाणी सुद्धा होते. काही महिलांच्या पाय किंवा आर्म पिट येथे केस वागण्याची गती मंदावते अथवा बंद होते. प्युबिक हेअर पातळ होतात. ऐवढेच नव्हे तर भुवया आणि पापण्या ही पातळ होऊ शकतात. त्याचसोबत केस गळण्यामागील एक मुख्य कारण असे सुद्धा की, हार्मोनल बदल. पेरिमेनोपॉज दरम्यान एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. हे हार्मोन केसांची डेंसिटी आणि विकास करतात. जेव्हा ते गळतात तेव्हा ते पातळ होतात.
काय उपचार कराल?
जर मेनोपॉज दरम्यान केस गळत असतील तर आपल्या लाइफस्टाइल मध्ये बदल केला पाहिजे. औषधं आणि योग्य ट्रिटमेंट घेतली पाहिजे. वेळेवर खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचसोबत हलक्या स्वरुपाचा व्यायाम ही करावा.
हेही वाचा- प्रेग्नेंसीत किती असावे हिमग्लोबीन?