Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyलांबसडक केसांसाठी असा हवा हेअर मसाज

लांबसडक केसांसाठी असा हवा हेअर मसाज

Subscribe

केसांना तेल लावणे ही एक प्राचीन हेअर केअर टेक्निक आहे. त्यामुळे केस मजबूत आणि मॉइश्चराइज होतात. काही लोक असे मानतात की, केसांना तेल लावल्याने व्हिटॅमिन मिळते. यामुळेच आपली आजी-पणजी ते हेअर एक्सपर्ट्स केसांना तेल लावण्याचा सल्ला देतात. तुम्ही सुद्धा केसांना विकेंडला केसांना ऑइल मसाज करत असाल. परंतु तुम्हाला हेअर ऑइलिंगची योग्य पद्धत माहितेय का?

केसांना मसाज करणे का गरजेचे?
केसांना तेल लावल्याने त्याची चमक, मऊसरपणा आणि हेल्थ टिकून राहते. ही रूटीन भारतातील आयुर्वेद आणि भारतातील एक जुनी परंपरा आहे. परंतु सध्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याची अधिक लोकप्रियता वाढली गेली आहे.

- Advertisement -

जर तुम्ही इंटरनेवर केसांना मसाज करण्याच्या टिप्स शोधत असाल तर तुम्हाला त्या संदर्भातील विविध व्हिडिओ मिळतील. तर काही लोक तुम्हाला केसांच्या मूळांवर नैसर्गिक तेल लावण्याचा सल्ला देतील. जेणेकरुन केसांना स्प्लिटेंन्सच्या समस्येपासून दूर ठेवता येईल. परंतु केसांसाठी नारळाचे तेलच बेस्ट मानले जाते.

केसांना मसाज करण्याची योग्य पद्धत
-योग्य तेलाची निवड करा
केसांना मसाज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल, जोजोबा ऑइल, द्राक्षाच्या बियांचे तेल,बदाम किंवा एवोकाडे तेलाचा वापर करू शकता. जर तुमचा स्कॅल्प तेलकट असेल तर बदामाचे किंवा द्राक्षाच्या बियांचे तेलन निवडू शकता.

- Advertisement -

-एसेंशियल तेलाची निवड करा
पेपरमिंट, लेंवेंडर किंवा चंदन सारख्या एसेंशियल तेलाला कॅरियर तेलासोबत मिक्स करुन पातळ करावे. अन्यथा एलर्जी होऊ शकते.

-तेल गरम करा
तुम्ही वापरत असलेले तेल काही सेकंद गॅसवर गरम करा. गरम तेलाचा वापर केल्याने स्कॅल्पला पोषक मिळू शकते.

-स्कॅल्पला मसाज करा
केसांना हळूहळू मसाज करावे. जवळजवळ 10-15 मिनिटे मसाज केले पाहिजे.


हेही वाचा- ऑईली केसांसाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini