Monday, March 17, 2025
HomeमानिनीBeauty Tips : डॅंड्रफ आणि हेअर फॉलवर हेअर स्टीम बेस्ट

Beauty Tips : डॅंड्रफ आणि हेअर फॉलवर हेअर स्टीम बेस्ट

Subscribe

डॅंड्रफ आणि हेअर फॉल आता एक सामान्य समस्या झाली आहे. कोंड्यामुळे केस वेगाने गळू लागतात. यावर उत्तम उपाय म्हणजे हेअर स्टीमिंग करणे. हेअर स्टीम केल्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. टाळूतील साचलेले तेल आणि घाण स्वच्छ होते. आज आपण डॅंड्रफ आणि हेअर फॉल दूर करण्यासाठी स्टीम किती उपयुक्त आहे ते जाणून घेऊयात.

हेअर स्टीमचे फायदे

हायड्रेशन मिळते

टाळूला खोलवर हायड्रेशन मिळते. केस मऊ आणि चमकदार होतात. तसेच केसांची वाढ देखील होते.

डॅंड्रफ कमी होतो

केस स्टीम केल्याने टाळू स्वच्छ होते आणि त्यात साचलेला कोंडा देखील दूर होतो. यासोबतच केसांमधील कोरडेपणा तसेच कोंड्यामुळे होणारी खाज सुटण्याची समस्या देखील कमी होते.

हेअर फॉलची समस्या कमी होईल

जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा केसांवर स्टीमचा वापर केला तर तुमच्या केसांना पूर्ण पोषण मिळेल. केस तुटण्याची समस्या कमी होईल. तसेच केस मजबूत होतात. यामुळे केस पूर्णपणे स्वच्छ होतात आणि त्यांची चमकही वाढते.

केसांचे आरोग्य चांगले राहते

केसांमध्ये तीन वेगवेगळे थर असतात. सर्वात बाहेरील थर म्हणजे क्यूटिकल जो मृत पेशींनी बनलेला असतो जो थरांमध्ये ओव्हरलॅप करतात, जे माशांच्या खवल्यांसारखे दिसतात. हे खवले केसांना मजबूत करायला मदत करतात आणि नुकसानापासून संरक्षण करतात. केसांना स्टीम दिल्यानंतर केसातील घाण पूर्णपणे निघून जाते केसांचे आरोग्य चांगले राहते.

केसांना पोषण देते

हेअर स्टीममुळे केसांना चांगले पोषण मिळते.

हेअर स्टीमिंग कशी करावी?

गरम पाण्यात टॉवेल भिजवून ओढणीसारखे गुंडाळा किंवा स्टीमर वापरा. 10-15 मिनिटे स्टीम द्या. शॅम्पूने धुवा आणि कंडिशनर लावा. आठवड्यातून 1-2 वेळा हे करा.

हेही वाचा : Health- वयानुसार दररोज किती वेळ चालावं?


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini