Friday, April 19, 2024
घरमानिनीFashionHair Style: फ्रीजी केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअर स्टाइल्स

Hair Style: फ्रीजी केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअर स्टाइल्स

Subscribe

बहुतांश वेळा असे होते केस धुतल्यानंतर ती खुप विस्कटलेली दिसून येतात. त्यामुळे व्यवस्थितीत बांधताना सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. अशातच आम्ही तुम्हाला काही अशा हेअर स्टाइल्स सांगणार आहोत ज्या खासकरुन फ्रीजी केसांसाठी परफेक्ट आहेतच पण त्यासाठी जास्त वेळ ही लागत नाही. केवळ 5 मिनिटांत तुमची हेअरस्टाइल कंम्पिल्ट होऊ शकते.

पोनीटेल हेअर स्टाइल
 
फ्रीजी केसांसाठी तुम्ही पोनीटेल हेअर स्टाइल करु शकता. यावेळी तुम्ही फ्रंटला फ्लिक्स सोडू शकता. जेणेकरुन तुमचा लूक अधिक खुलून दिसेल. पोनीटेल बांधण्यासाठी तु्म्ही स्क्रंचीचा वापर करु शकता.जेणेकरुन केस तुटणार नाहीत आणि हेअरस्टाइल खुप वेळ राहिल.

- Advertisement -

सिंपल ब्रेड हेअर स्टाइल


अशा प्रकारची हेअर स्टाइल तुम्ही दररोज ही करु शकता. केसांची वेणी बांधणे सोप्पे आहे. तर फ्रंटला तुम्ही स्लीक स्टाइलिंग करा जेणेकरुन तुमचा लूक एलिगेंट आणि क्लासी दिसेल.

- Advertisement -

मेसी फिश टेल ब्रेड हेअर स्टाइल

केसांचा वॉल्यूम वाढल्यासारखा दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे फ्रंटला मेसी स्टाइलिंग करु शकता. त्याचसोबत केसांची खजूर वेणी बांधू शकता. याला आकर्षक लूक देण्यासाठी तुम्ही बारीक स्टोन असणार एक्सेसरिज वापरु शकता.

मेसी बन हेअर स्टाइल


अशा हेअर स्टाइलमध्ये तु्म्ही अत्यंत आकर्षक दिसता. यासाठी सर्वात प्रथम मेसी पोनी टेल बांधा आणि त्यानंतर त्याला यू-पिन्सच्या मदतीने आकर्षक लूक द्या. अशा प्रकारची हेअर स्टाइल कोणत्याही ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट आहे.


हेही वाचा- Lingerie- मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini