स्वस्तात मस्त हेअर ट्रान्सप्लांट; ‘या’ देशात परदेशी नागरिकांची रांग

सध्या हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जगभरातील लोकांनी तुर्की (Turkey) या देशात धाव घ्यायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी अत्यंत अल्प खर्चात (Low Budget) हेअर ट्रान्सप्लांट केली जात असल्याने विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे.

केसांची वाढ न होणे, केस गळती, कोंडा आदी समस्यांमुळे जगभरातील लोक त्रस्त झाले आहेत. हेअर ट्रान्सप्लांट (Hair transplant) करणे फार खर्चिक आणि जोखमीचं असल्याने अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सध्या हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जगभरातील लोकांनी तुर्की (Turkey) या देशात धाव घ्यायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी अत्यंत अल्प खर्चात (Low Budget) हेअर ट्रान्सप्लांट केली जात असल्याने विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी अनेकजण तुर्की देशात धाव घेत आहेत. Cosmedica Clinic ने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीतील प्रतिष्ठित क्लिनिकमध्ये (Clinic) स्वस्त दरात हेअर ट्रान्सप्लांट करून दिले जाते. यासाठी एक ते सहा लाखांपर्यंतचा खर्च होतो. अर्थात तुम्ही कोणत्या प्रकारे हेअर ट्रान्सप्लांट करू इच्छिता, त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागणार, कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे आणि टीमच्या अनुभवावर हा खर्च अवलंबून असतो.

पश्चिमी युरोपीय (Western Europe) देशात हेअर ट्रान्सप्लांटसाठी अधिक खर्च येतो. त्या तुलनेत तुर्कीमध्ये अत्यंत माफक दरात हेअर ट्रान्सप्लांट केली जाते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुर्की हा देश महत्त्वाचा ठरला आहे.

तुर्कीतील इंस्ताबूल (Istanbul) येथे सर्वाधिक हेअर ट्रान्सप्लांटचे क्लिनिक आहेत. तसेच, इथे अनेक अनुभवी डॉक्टर्स (Experienced Doctors) उपलब्ध असल्याने अनेकजण इंस्ताबूल येथे हेअर ट्रान्सप्लांटसाठी जातात. येथे फॉलिक्युलर यूनिट एक्सट्रॅक्शन (follicular unit extraction) पद्धत सर्वाधिक वापरली जाते.

विदेशी देशांमधून तुर्कीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्याने तेथील क्लिनिक्समधूनही ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स देऊ केल्या जातात. एअरपोर्टवरून क्लिनिकपर्यंत आणणे, मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करणे अशा ऑफर्स दिल्या जात असल्याने परदेशी नागरिक आवर्जून तुर्कीत येत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये इंस्ताबूल विमानतळावर अनेक ग्राहकांनी हेअर ट्रान्सप्लांटसाठी गर्दी केल्याचं दिसतंय.