प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेसोबत केसांचीही काळजी घ्यायला हवी. परंतु अनेकदा आपण त्वचेची काळजी घेता घेता केसांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे केस चमकदार आणि लांबसडक राहण्यास मदत होईल.
कांद्याच्या मदतीने घ्या केसांची काळजी
- कांदा आणि दही
केस गळत असल्यास कांद्याच्या रसात दोन चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.
- कांदा आणि मध
2 चमचे कांद्याच्या रसात 1 चमचा मध घाला. हे तयार मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. साधारण 30 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
- कांदा आणि खोबरेल तेल
2 चमचे खोबऱ्याच्या तेलात 1 चमचा कांद्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. हे मिश्रण रात्रभर तसेच लावलेले ठेवा आणि सकाळी केस स्वच्छ धुवा.
- कांदा आणि लिंबू
2 चमचे कांद्याच्या रसात 1 चमचा लिंबू रस मिक्स करा. हे मिश्रण केसावर लावा आणि एका तासानंतर केस स्वच्छ करा.
- कांदा आणि बीअर
एका वाटीमध्ये 2 चमचे बीअर आणि 2 चमचे कांद्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण केसाला लावून 30 मिनिटे तसेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून चांगले कोरडे करा. यामुळे केस गळती थांबते.
हेही वाचा :