घरलाईफस्टाईलहँन्ड सानिटायझर कोरोना पासूनच वाचवत नाही तर, इतर महत्वाच्या कामासाठी आहे उपयुक्त...

हँन्ड सानिटायझर कोरोना पासूनच वाचवत नाही तर, इतर महत्वाच्या कामासाठी आहे उपयुक्त !!

Subscribe

हँन्ड सानिटायझरचे या कठीण काळात सर्वाधिक महत्वाचे आहे. हे एखाद्या ढाली सारखे आपले या व्हायरस पासून संरक्षण करते. सानिटायझरचा उपयोग कोरोना व्हायरस सारख्या गंभीर समस्ये वतरिक्त आणखी काही म्हत्वाच्या कामाकरिता याचा उपयोग होतो

 

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना रुग्णासंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाबधितांचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तर दुसरीकडे आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत.सध्या देशभरामध्ये लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरस पासून सुरक्षितराहण्यासाठी लसीकरणा सोबतच मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे इतकेच पुरेसे नसून वेळो वेळी हात सानिटाइज करणे हे देखील महत्वाचे आहे. आरोग्य तज्ञाच्या मतानुसार हँन्ड सानिटायझरचे या कठीण काळात सर्वाधिक महत्वाचे आहे. हे एखाद्या ढाली सारखे आपले या व्हायरस पासून संरक्षण करते. सानिटायझरचा उपयोग कोरोना व्हायरस सारख्या गंभीर समस्ये वतरिक्त आणखी काही म्हत्वाच्या कामाकरिता याचा उपयोग होतो. सानिटायझर चा इतर कोणत्या कामासाठी उपयोग होतो जाणून घेऊया.

- Advertisement -

आरसा स्वच्छ करण्यासाठी 

हँन्ड सानिटायझरचा वापर फक्त विषाणूची सफाई कण्यासाठी नाही तर आपल्या घरातील आरसा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच घरातील खिडकी,दरवाचे इतर काचेच्या वस्तु देखील याने स्वच्छ केल्या जाऊ शकतात.

- Advertisement -

परमनेण्ट मार्करचे डाग हटवण्यासाठी 

काही महत्वाच्या फाइल वर किंवा वाइटबोर्ड परमनेण्ट मार्करचे डाग हटवण्यासाठी सानिटायझरचा वापर करून ते मिटवू शकतात. डागांवर सानिटायझरचा स्प्रे शिंपडून एका स्वच्छ कपडाने पुसल्यास डाग गायब होतात.

मोबाईल फोनवरील स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी

आपण दिवसभर मोबाईलचा वापर करतो त्यावर सर्वाधिक विषाणूचा वावर असतो तसेच मोबाईल स्क्रीन सुद्धा खराब होते. हँन्ड सानिटायझरचा वापर करून मोबाईल स्क्रीन साफ करता येते तसेच यामुळे मोबाईलवर अधिक शाईन चमक देखील येते.

स्टीकर हटवण्याकरिता उपयुक्त

काही वेळेस मार्केट मधून आणलेल्या काही वस्तूंवरील स्टीकर काही केल्या निघत नसेल तर त्यावर सानिटायझर लावल्यास अत्यंत सहजरित्या स्टीकर निघते.

लिपस्टिकचे डाग मिटवण्यासाठी 

कधी अचानक चुकून कपड्यांवर लिपस्टिकचे ठसे उमटले जातता आणि ते साफ करणे मोठे कठीण काम होऊन बसते. अशा वेळेस लिपस्टिकच्या ठश्यांवर सानिटायझरचास्प्रे मारून हलकेसे रागडल्यास डाग कमी होऊ शकतात.

मेकअप ब्रश क्लीनिंग

बर्‍याचदा मेकअप ब्रश साफ करण्यास अनेकांना आळस येतो. पण अस्वच्छ मेकअप ब्रशचा वापर केल्याने त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. मेकअप ब्रश जर वारंवार साबणाने किंवा पाण्याने धुतले गेले तर ते लवकर खराब होऊ शकतात. अशा वेळेस सानिटायझरचा वापर करून स्वच्छ करू शकता.

सनग्लासेस/चष्म्याच्या काचेची स्वच्छता

जर आपण वारंवार आपल्या सनग्लासेसला स्पर्श केला तर आपल्या हातांमधील विषाणू धूळ सनग्लासेसवर चढते, या पासून बचावासाठी सनग्लासेसवर सानिटायझर स्प्रे फवारणी करून मऊ सूती कापडाच्या मदतीने पुसून टाका. आपले सनग्लासेस नव्या सारखे चमकू लागतील.


हे हि वाचा – स्मार्टफोनमध्ये Oximeter App वापरताय? तत्काळ करा डिलिट, पोलिसांचा अलर्ट जारी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -