वाचा हनुमान जयंतीचे महत्त्व

प्रभू राम यांच्या भक्त आणि खोडकर आणि अति शक्तिशाली अशा पवनपुत्र हनुमान यांच्या जयंती निमित्त हनुमान जयंतीचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.

प्रातिनिधीक फोटो
वाचा हनुमान जयंतीचे महत्त्व

प्रभू राम यांच्यावर निस्सीम भक्ती असणाऱ्या हनुमान यांचे आज जन्म उत्सव म्हणजे हनुमान जयंती. संपूर्ण देशात, विदेशात मोठ्या उत्सवात हनुमान जयंती साजरी केली जाते. खोडकर आणि अतिशय शक्तिशाली म्हणून हनुमाना यांच्याकडे पाहिले जाते. तसेच हनुमान म्हणजेच शंकराचा ११ वा अवतार होय. पवनपुत्र हनुमानाला मर्कट चेहरा प्राप्त असून त्यांच्यामध्ये शंकराचे अंश असल्याचे मानले जाते. तर हनुमान यांचे स्मरण केल्याने सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते, आणि मनातील भितीसुद्धा दुर होत, असे म्हटले जाते. हनुमान यांना शिवाचा रूद्र रूप मानले जाते. तसेच पवनपुत्र, बजरंगबली आणि मारूती म्हणूनही संबोधले जाते.

कधी हनुमान जयंती साजरी केली जाते?

पवनपुत्र हनुमानाची जयंती भारतामध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. तसेच मार्च किंवा एप्रिल या महिन्याच हनुमान जयंती उत्सव येतो. यावेळी हनुमान जयंती आज १९ एप्रिलला आहे. जयंतीचा शुभ मुहूर्त हा १८ एप्रिलला सायंकाळी ७ वाजून २६ मिनिटाला सुरू झाला आहे. तर १९ एप्रिल रोजी ४ वाजून ४१ मिनिटांनी मुहूर्ताची समाप्ती होणार आहे.

कशी कराल पुजा?

अंजनी पुत्र हनुमानाचा जन्म पहाटे सूर्योदयाच्या वेळी झाला असल्याने सकाळी उठून सीता-राम आणि हनुमानचे स्मरण करावे. अनेक सामाजिक मंडळाकडून तसेच घरगुती स्तरावर पूजेचे आयोजन केले जाते. तसेच पुजेच्या दरम्यान हनुमानाच्या मूर्तीला बेसननाचे लाडू तसेच लाल रंगाच्या शेवया आणि तुपाचा नैवैद्य चढवण्याची पद्धत आहे. पूजेदरम्यान लाल रंगाची फुले, रुईची पाने, चमेलीचे तेल आणि सुपाऱ्यांचा वापर सर्वाधिक केला जातो. तसेत पश्चिम भारतात हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी उपवास धरला जातो. तर उत्तर भारतात जयंती दिवशी व्रत केले जाते.