घरलाईफस्टाईलHappy New Year 2022: या वर्षी वजन कमी करायचयं मग या ५...

Happy New Year 2022: या वर्षी वजन कमी करायचयं मग या ५ गोष्टी वाचा

Subscribe

नवीन वर्षारंभ झाला असून यावर्षी जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल तर त्यासाठी फार काही खटाटोप न करता फक्त या ५ टीप्स वाचा.

लक्ष्य
आपल्यापैकी बरेचजण नवीन वर्षापासून एखाद काम पूर्ण करण्याचा संकल्प करतात. त्यातही वजन कमी करण्याचा निश्चय अनेकजण करतात. जिम, डाएट सुरू होतं. पण काही दिवसांनतर सगळं अचानक कंटाळवाणं वाटू लागतं आणि संकल्प बारगळतो. नवीन वर्ष उजडेपर्यंत वजन अजून वाढतं. यामुळे आधी मनाशी नक्की ठरवां.

- Advertisement -

संयम ठेवा
जितके वेगाने वजन वाढते तितक्याच वेगाने ते कमी मात्र होत नाही. यामुळे संयम ठेवा.

खाण्यापिण्याच्या सवयी बदला
आतापर्यंत तुम्ही बिनधास्तपणे खाणारे गोड, तेलकट आणि जंक फूड हळू हळू बंद करा. एकदम बंद करु नका कारण शरीराला त्या पदार्थांच्या सेवनाची सवय झालेली आहे. अचानक ते बंद केल्यास शरीर त्रास देते. यामुळे डाएटमधून सर्वात आधी गोड पदार्थ खाणं कमी करा. त्यानंतर दोन दिवसांनी जंक फूड खाणे थांबवा. नंतर तेलकट-तुपकट पदार्थ कमी करा.
त्याजागी सुका मेवा, फळं, ओट्स हे पदार्थ खाण्यास सुरुवात करा. तसेच जिम ट्रेनरच्या मदतीने कॅलरी डाएट प्लान बनवा. त्याप्रमाणे आहार घ्या.

- Advertisement -

व्यायाम, वर्कआऊट
जीममध्ये अनेकजण वजन उचलताना बघून तुम्ही ते करायला जाऊ नका. त्याने तुम्हांला दुखापत होऊ शकते. यामुळे वजन उचलल्याने वजन कमी होईल असा विचार करु नका. जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -