सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये आरोग्याची काळजी आणि आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभराचा तणाव आणि समस्यांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर कुठे ना कुठे होत असतो. अशातच रात्री शांत झोप लागावी म्हणून मेडिटेशन, सेल्फ केअरसाठी वेळ काढला पाहिजे. त्यापैकीच एक असलेल्या हेड मसाजमुळेही तुम्हाला काही फायदे मिळतात.
-तणाव कमी होतो
झोपण्यापूर्वी डोक्याला मसाज केल्याने तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते. तुमचे डोके, खांदे आणि मान येथील स्नायूंना आराम मिळते. त्याचसोबत कॉर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोनचा स्तर कमी केला जातो.
-दुखण्यापासून आराम
काही लोकांना विविध कारणास्तव डोकेदुखी, माइग्रेनचा सामना करावा लागतो. जसे की तणाव, साइनस. झोपण्यापूर्वी डोक्याला मसाज केल्याने चिंतेच्या स्थितीपासून थोडा वेळ दूर राहता येते. या व्यतिरिक्त शरिराला रक्त पुरवठा ही व्यवस्थितीत होतो.
-उत्तम झोप लागते
रात्रीच्या वेळी उत्तम झोप हवी असेल तर नक्कीच रात्रीच्या वेळी हेड मसाज जरूर करा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. दिवसभराचा थकवा यामुळे दूर होतो आणि तुमचे हेल्थ सुधारले जाते.
-त्वचा हेल्दी होते
झोपण्यापूर्वी डोक्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामुळे त्वचा मॉइश्चराइजर होते. तसेच तुमची त्वचा हेल्दी होते.
हेही वाचा- गोल चेहऱ्यासाठी कधीच करु नका अशी हेअरस्टाइल