माइग्रेन ही सामान्य न्युरोलॉजिकल समस्या आहे. या समस्येत डोक्याचा एक हिस्सा खुप दुखतो. या दुखण्यासह हृदयाचे ठोके वाढणे, मळमळ, उलटी आणि ध्वनी-प्रकाशाच्या प्रती अत्याधिक संवेदनशीलतेचा अनुभव येऊ शकतो. माइग्रेनमुळे डोकेदुखी ही सामान्य डोकेदुखीच्या तुलनेत अधिक तीव्र असू शकतो. यावर गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असते. कारण काही स्थितीत हा साइकोसोमेटिक डिसऑर्डरचे कारण असण्याची शक्यता असू शकते. (Migraine and heart attack)
संशोधकांच्या मते, जर तुम्हाला दीर्घकाळ माइग्रेनची समस्या असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असते. माइग्रेनवर लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या काही आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात. हेच कारण आहे की, वेळीच यावर उपचार केला पाहिजे. तर जाणून घेऊयात माइग्रेनच्या कारणास्तव होणाऱ्या आरोग्यासंबंधितच्या समस्यांबद्दल अधिक.
माइग्रेनच्या कारणास्तव होणाऱ्या समस्या
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, जगभरात स्ट्रोकचा मृत्यू दर हे दुसरे सर्वाधिक सामान्य कारण आहे. भारतात वर्षाला 1.85 लाखांपेक्षा अधिक लोक स्ट्रोकचा शिकार होतात. संशोधकांना असे आढळले आहे की, माइग्रेनमुळे पीडित असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असू शकतो. माइग्रेन आणि इस्केमिक स्ट्रोक मधील संबंधाबद्दल काही अभ्यासात असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. कारण या दोन्ही समस्या रक्तवाहिन्यांच्या कार्यासंबंधित समस्या आहेत.
अभ्यासातून असे समोर आले आहे की, माइग्रेनमुळे मायोकार्डियल इन्फ्रक्शन, स्ट्रोक आणि हृदयाच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढू शकतो.
माइग्रेन ट्रिगर होण्यापासून असा करा बचाव
हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, माइग्रेनमुळे होणारी डोकेदुखी काही स्थितींमध्ये गंभीर आणि दीर्घकालीन रुपात मेंदूला नुकसान पोहचवू शकते. काही स्थितींमध्ये याचे कारण कार्डियोवस्कुलर समस्येची सुद्धा जोखिम असते. पुढील काही गोष्टींनी तुम्ही त्यापासून बचाव करू शकता.
-जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर त्याला ट्रिगर करणाऱ्या समस्येबद्दल जाणून घ्या आणि त्या पासून बचाव करण्याचे उपाय करत रहा.
-हेल्दी फूडचे सेवन करा आणि वेळोवेळी भोजन करा.
-कॅफेनच्या अधिक सेवनामुळे माइग्रेनचा धोका वाढू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी गरजेचे आहे की, चहा-कॉफी सारख्या गोष्टींचे सेवन कमी करा.
हेही वाचा- लेट नाइट एंग्जायटीची समस्या असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो