Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Health डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देतील 'हे' फूड्स

डोकेदुखीच्या समस्येपासून आराम देतील ‘हे’ फूड्स

Subscribe

डोकेदुखी अशी एक समस्या आहे, त्यामुळे बहुतांश लोक त्रस्त होतात. डोकेदुखीमुळे आपण काही कामे व्यवस्थितीत करू शकत नाही. याच कारणास्तव कामात मन ही लागत नाही. आपण अधिक चिडचिड करतो आणि याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. काही लोक अशी असतात ज्यांची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर लगेच ते मेडिसिन घेतात. जेणेकरुन आराम मिळेल. अशातच तुम्ही डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळावा म्हणून तुमच्या डाएटमध्ये पुढील काही फूड्सचा समावेश करू शकता. (Headache relief foods)

आलं

- Advertisement -


आल्यामध्ये असे काही गुण असतात जे तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येपासून दूर ठेवतात. अशातच डोकेदुखीची समस्या उद्भवल्यास तुम्ही आल्याची चहा पिऊ शकता.

नारळाचे पाणी

- Advertisement -


नारळाचे पाणी सुद्धा डोकेदुखीच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत करु शकते. नारळाच्या पाण्यात काही प्रकारचे पोषक तत्वे जसे की, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमन सी असते. जे शरिराला हाइड्रेट ठेवण्यासह थकवा दूर करण्यास मदत करते.

फळांचे सेवन


हेल्दी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. अशातच डोकेदुखी होत असेल तर केळ्याचे सेवन करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम सारखे तत्व असतात. जे डोकेदुखीपासून आराम देतात.

हिरव्या पालेभाज्या


हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. जे शरीरासाठी अत्यंत गरजेचे असतात. त्याचसोबत यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डोकेदुखीची समस्या तुम्हाला सतत होत असेल तर तुमच्या डाएटमध्ये हिरव्य पालेभाज्यांचा समावेश अधिक करा. यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.


हेही वाचा- रात्रीचे जेवण बंद करणे आरोग्यास हानिकारक

- Advertisment -

Manini