इअरफोन किंवा हेडफोन, आज प्रत्येक स्मार्टफोन युजरची गरज झाली आहे. बहुतांशवेळा असे पाहिले जाते की, काही लोक दिवसभर हेडफोन लावतात. त्याच्या माध्यमातून गाणी ऐकणे, फोनवर बोलणे अशा काही गोष्टी करत असतात.
एका सर्वेनुसार 47 टक्के लोक गाणी ऐकतात 42 टक्के लोक हेडफोनच्या मदतीने बोलतात तर 20 टक्के लो काम करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी आमि 20 टक्के लो फॅशन एक्सेसरीजच्या रुपात हेडफोनचा वापर करतात. असे केल्याने कानाचे फार नुकसान होते. खरंतर वयानुसार एका मर्यादित काळानंतर हेडफोन लावू नयेत. जर तुम्ही सुद्धा अत्याधिक प्रमाणात हेडफोनचा वापर करत असाल तर वयानुसार तो किती केला पाहिजे हेच आपण जाणून घेऊयात.
-रिपोर्ट्सनुसार 19 ते 29 वयोगटातील व्यक्तींनी प्रत्येक आठवड्यात 7.8 तास, प्रत्येक महिन्याला 33.9 तास आणि वर्षाला 405.9 तासांपेक्षा अधिक ईअरफोनचा वापर करू नये.
-वयाच्या 30-49 वयोगटातील व्यक्तींनी प्रत्येक आठवड्याला 5.5 तास, प्रत्येक महिन्याला 23.9 तास आणि प्रत्येक वर्षाला 286 तासांपेक्षा अधिक वेळ हेडफोनचा वापर करू नये.
-50-79 वयातील व्यक्तींनी प्रत्येक आठवड्याला 5.2 तास, प्रत्येक महिन्याला 22.6 तास आणि प्रत्येक वर्षाला 270.4 तासांपेक्षा अधिक वेळ हेडफोनचा वापर करू नये.
-जरी तुम्ही हेडफोनचा वापर करत असाल तर त्याचा आवाज 105-110 डेसीबलपर्यंत नसावा. कारण रिसर्च असे सांगते की, जर एखाद्या म्युझिक इक्युपमेंटला 85 डीबीपेक्षा अधिक आणि 2 तासांपर्यंत ऐकल्यास कानांना नुकसान पोहचले जाऊ शकते.
-अधिक आवाजात तुम्ही गाणी किती वेळ ऐकता त्यामुळे ही तुमच्या कानाला नुकसान पोहचले जाऊ शकते. अधिक आवाजातील हेडफोनचा वापर एका तासापेक्षा अधिक वेळ करू नये. असे न केल्यास तुमच्या कानाच्या पडद्याला त्रास होऊन तो दुखू शकतो.
हेही वाचा- कपड्यांमुळे ही पडू शकता आजारी