तांदळापासून बनवण्यात येणाऱ्या पातळ अशा पदार्थाला पेज असे संबोधले जाते. या तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढून आजार दूर होतात. तसेच तांदळाची पेज खूपच पौष्टिक असते. कोकणात सकाळच्या न्याहरी सोबत देखील ही पेज घेतली जाते. गावठी तांदूळ कोकणात मिळतो. तसेच आता बाजार पेठेतही पेजेचा तांदूळ अगदी सहज उपलब्ध होतो. एखाद्या आजारी व्यक्तीला थकवा आल्यास ही पेज अधिक लाभदायक ठरते.
- Advertisement -
- तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.
- तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते आणि थकवा देखील दूर होतो.
- तांदळाची पेज आणि गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते.
- तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
- तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
- केळे आणि तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात.
- तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.
- तांदळाच्या पेजेत मीठ आणि जिरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते.
- भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उर्जा मिळते. त्यामुळे एखाद्यावेळेस बाहेर जात असल्यास जाताना पेजेचे सेवन करावे. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
- व्हायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी. आजारपणात आलेली कमजोरी दूर होते.
- तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.
- तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायमही होतो आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावरली काळे डाग निघून जातात.
- तांदळाची पेज केसांकरता एक उत्तम टाँनिक आहे. पेजेच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो. केस रेशमी, चमकदार आणि मजबूत होतात. रूक्षता निघून जाते. तसेच दुतोंडी केसांची समस्या दूर होते. कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.
- तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
- डायरियात डिहायड्रेशन होते अशा वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी, यामुळे ताकद येते.
- सर्दी, पडसे, ताप, व्हायरल इंनफेक्शनमध्ये तांदळाचे पाणि प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढून हे आजार दूर होतात.
हेही वाचा – थायरॉइड आहे, काळजी नसावी