Saturday, February 8, 2025
HomeमानिनीSaffron : चिमूटभर केशराचे भन्नाट फायदे

Saffron : चिमूटभर केशराचे भन्नाट फायदे

Subscribe

स्वयंपाकघरात केशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फार पूर्वीपासून पदार्थाची चव वाढवण्यासाठी केशर वापरले जाते. अनेक गुणांनी समृद्ध असे केशर आहे. यात ऍटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए सारखी पोषकतत्वे आढळतात. साधारणपणे केशर खाद्यपदार्थांमध्ये वापरावे असे सांगितले जाते पण, केशरचा वापर शारीरिक व्याधीं दूर करण्यासाठी, सौंदर्यासाठी करता येतो. चला तर मग जाणून घेऊयात, चिमूटभर केशराचे भन्नाट फायदे कोणते आहेत.

केशराचे फायदे –

  • वारंवार ऍसिडीटी, पोटदुखी, अपचन याचा त्रास असेल तर केशर खावे, आराम मिळतो.
  • प्रेग्नेट स्त्रियांसाठी केशर गुणकारी असते.
  • निद्रानाशेचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी केशर दूधात टाकून प्यावे. रात्री केशराचे दूध प्यायल्याने शांत झोप लागते.
  • गोष्टी विसरण्याची सवय असेल तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केशराचे सेवन करावे.
  • ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे, अशांनी दररोज केशर खावे.
  • केशर खाल्ल्याने त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार होते.
  • लहान मुलांच्या आरोग्यासाठी केशर वरदान मानले जाते. त्यामुळे मुलांच्या आहारात अवश्य त्याचा समावेश करावा.
  • केशर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते. ज्यामुळे तुम्ही विविध संसर्गापासून दूर राहता.
  • केशरमधील ऍटी-ऑक्सिडंट डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.
  • वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर केशर नक्की खावे. केशर भूक कमी करते आणि कॅलरीजचे प्रमाण वाढवते.
  • केशरातील गुणधर्मांमुळे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तुम्ही या दिवसात केशरचे दूघ प्यायला हवे.
  • बदलत्या वातावरणामुळे सर्दी- खोकला, ताप जाणवतो. अशा परिस्थितीत केशरचे दूध किंवा चहा प्यावा, आराम मिळतो.
  • आजकाल सांधेदुखी सामान्य समस्या झाली आहे. अशावेळी केशराचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. यामुळे हाडांशी संबधित समस्या कमी होतात
  • शरीराला कोणत्याही प्रकारची जखम झाली असल्यास केशराचा लेप लावावा. असे केल्याने लवकर आराम मिळतो.
  • तीव्र किंवा सौम्य डोकेदुखी असल्यास चंदनात केशर मिक्स करावी आणि त्याची पेस्ट बनवावी. तयार पेस्ट डोक्यावर लावा आराम मिळेल.
  • केशरमधील व्हिटॅमिन ए, ऍटी-ऑक्डिडंट केस गळण्याची समस्या कमी करतात.
  • केशरमध्ये कॅन्सरशी लढण्याची ताकद असते. केशरमधील क्रोसिन कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात आणि कॅन्सरच्या नवीन पेशी तयार होण्यापासून रोखतात.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini