जाणून घ्या गुणकारी लवंगाचे फायदे!

Benefits Clove
लवंगाचे आरोग्यदायी फायदे

बऱ्याचदा घरातील असे काही पदार्थ असतात, ज्याचा छोट्या – मोठ्या आजारांवर चांगलाच फायदा होतो. त्यामध्ये लवंग हा एक पदार्थ आहे. ज्याचा मसाल्याकरता तर चांगला वापर केला जातो. मात्र, काही आजारांवर देखील लवंग एक रामबाण उपाय ठरतो.

दाताचे दुखणे

दातांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांना लवंग कमी करण्यात फायदेशीर ठरते. बऱ्याचदा दातदुखी केव्हाही चाळवते आणि त्यावेळी नेमके काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी एका कापसाच्या गोळ्यावर लवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. यामुळे लगेचच आराम मिळेल.

तोंडाची दुर्गंधी

लवंगामध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखीवर गुणकारी ठरते. त्यामुळे जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल. तर दाताखाली लवंग ठेवल्याने दुर्गंधी दूर होते शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटते.

मळमळ होणे

बऱ्याच जणांना प्रवासाची सवय नसते. त्यामुळे अचानक प्रवास केल्यास अनेकांना प्रवासात किंवा अपचन झाल्यावर मळ्ळ किंवा उलटीसारखे वाटते. यावेळी लवंग फार फायदेशीर ठरते. त्यामुळे मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल, त्यावेळी तोंडात लवंग टाकून चघळावी. यामुळे फायदा होतो.

सायनस सारख्या समस्या

मायग्रेन, सर्दी, कानातील इन्फेकशनसाठी लवंगाच्या तेलाचा वापर करण्यात यावा. तसेच सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायन असणाऱ्यांनी रोज ३ -४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्शन दूर होईल आणि श्वास घेताना होणारा त्रास कमी होईल. तसेच लवंगाच्या वासाने ताण दूर होतो. तुम्ही तणावात असाल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात लवंग टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

चेहऱ्यावरील समस्या

चेहऱ्यावर मुरमे येत असतील तर लवंग खाल्ल्याने मुरम येणे बंद होतील. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते. तसेच लवंगाच्या तेलात अँटी मायक्रोबियल असे गुणधर्म असतात. पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्सही वाढत नाहीत आणि डाग देखील दूर होतात.