घरलाईफस्टाईलछोट्या काळ्यामिरीचे मोठे फायदे

छोट्या काळ्यामिरीचे मोठे फायदे

Subscribe

काळीमिरी दिसायला जरी छोटी असली तरी मात्र तिचे फायदे खूप मोठे आहेत. काळ्या मिरीमध्ये लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक, क्रोमियम, मँगनीज, जीवनसत्व ए, सी आणि याचबरोबर इतर ही अनेक औषधी घटक असल्यामुळे काळी मिरी औषधीवर्धक आहे.

स्वयंपाक घरातील मसाल्याचे पदार्थ हे जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच मर्यादीत नसून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यातीलच एक काळी मिरी हीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

  • जुलाब आणि अपचनाचा त्रास झाल्यास काळ्या मिरीचे सेवन करावे. यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर काळ्यामिरीचे सेवन केल्याने पचनशक्ती देखील सुधारते.health benefits black pepper
  • काळ्या मिरीमध्ये वातहर गुण असल्यामुळे काण्यामिरीचे सेवन केल्यास पोटातील वायू साठून राहत नाही. त्यामुळे पोटात गॅस झाल्यानंतर काळी मिरी खाल्यास त्वरित आराम मिळतो.
  • वजन कमी करायचे असल्यास काळ्यामिरीचे सेवन करावे. काळ्यामिरीमध्ये फायटोन्यूट्रियंटस्मुळे अतिरीक्त चरबी घटण्यास मदत होते. काळ्यामिरीचे सेवन केल्याने शरीराला अधिक घाम आणि लघवीला होते. यातून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.health benefits black pepper
  • सर्दी, खोकला आणि कफ झाला असल्यास काळी मिरी खाल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच गरम दूधासोबत काळ्यामिरीचे सेवन करावे. अधिक प्रमाणात सर्दी झाली असल्यास काळी मिरी आणि लसूण याचे सेवन करावे.
  • भूक लागत नसल्याची तक्रार असल्यास त्या व्यक्तीने काळी मिरीचे सेवन करावे. यामुळे भूक लागण्यास मदत होते.

टीप : काळी मिरी ही अधिक प्रमाणात उष्ण असते. त्यामुळे तिचे सेवन करताना जेवणातून, सॅलेड किंवा ताकासारख्या पेयातून करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -