घरलाईफस्टाईलआरोग्यदायी 'धणे'

आरोग्यदायी ‘धणे’

Subscribe

धणे हा मसाल्यातील एक पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

धणे हे जेवणापूर्तेच मर्यादीत राहिलेले नाही. तर या धण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. धण्याचे सेवन केल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

  • आम्लपित्तचा त्रास होत असल्यास धण्याची पूड आणि खडीसाखर खाल्याने आम्लपित्त कमी होऊन तात्काळ आराम मिळतो.
  • अपचनामुळे जुलाब होत असल्यास धण्याच्या काढाचे सेवन करावे. यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते.
  • पोटातील गॅस कमी करण्यासाठी बडीशेप आणि धणे एकत्र खाल्यास गॅस निघून जातो.
    home remedies for coriander
  • हातापायाची जळजळ होत असल्यास रात्री एक पाण्यात एक चमचा धणे आणि जिरं मिक्स करुन ते पाणी गाळून सकाळी प्यायल्याने जळजळ कमी होते.
  • लघवीला जळजळ होत असल्यास चार चमचे धणे आठ ग्लास पाण्यात भिजून ते पाणी सकाळी प्यायल्याने आराम मिळतो.
  • गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी धणे पुड आणि १० ग्रॅम खडीसाखरेचे सेवन केल्याने उलट्या थांबण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -