ओवा औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार ओव्याचे अनेक फायदे आहेत. ओवा आपल्या स्वयंपाकघरात हमखास असतोच. पराठा, भजी यासारख्या पदार्थामध्ये ओवा टाकला जातो. ओव्यामध्ये फायबर, फॅटी – ऍसिड, प्रोटिन्स आढळतात. याशिवाय अनेक आजारांवर ओवा रामबाण उपाय आहे. जाणून घेऊयात, ओव्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो.
- ओव्यामध्ये वेदनाशामक आणि दाहकविरोधी गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे सांधे आणि स्नायू वेदना कमी होण्यास मदत मिळते.
- वारंवार पोटदुखी , अपचन, पोट फुगणे यासारख्या समस्या जाणवत असतील, तर तुम्ही ओव्याचे सेवन करावे.
- ओवा आतड्याच्या जखमा बरे करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.
- ओव्याचे सेवन केल्याने अनियंत्रित रक्तदाब नियंत्रणात येतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पारंपारिक औषधांमध्ये ओव्याचा वापर केला जातो.
- ओवा एक प्रभावी ऍटी-एजंट म्हणून काम करते. तुम्हाला कफ-खोकला झाला असेल तर ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
- वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरेल. ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यासाठी उपयुक्त ठरते.
घरी लावा ओव्याचे झाड –
- ओव्याचे बियाणे विकत आणा.
- फक्त ते उत्तम दर्जाचे असतील याची काळजी घ्यावी.
- माती पूर्णपणे ओली करुन घ्यावी. यानंतर बिया खोलवर मातीत पेरा. पुन्हा मातीने बिया झाकून घ्या.
- कुंडी हलक्या उन्हात ठेवा.
- माती ओलसर ठेवावी, पण त्यात पाणी भरुन राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- रोपांना पाणी घालणे टाळा, यामुळे रोपाची मुळे कुजतात.
- दर 2 ते 3 आठवड्यांनी होममेड कंपोस्ट खत रोपासाठी वापरू शकता.
हेही पाहा –