घरलाईफस्टाईलबद्धकोष्ठता असल्यास, नक्की खा 'हे' पदार्थ

बद्धकोष्ठता असल्यास, नक्की खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

बद्धकोष्ठता असल्यास, काय खावं हे मात्र फार कमी लोकांना माहीत असतं. त्रास होत असतो त्यामुळं नक्की काय खावं त्याचा काय परिणाम होतो याची माहिती फारच कमी लोकांना असते. काय खावं याची माहिती खास तुमच्यासाठी.

बदलती जीवनशैली, त्यात बऱ्याचदा वेळेवर जेवण न मिळणं, मिळालं तरीही बाहरेचं जास्त खाणं. या सगळ्यामुळं शरीरावर खूपच परिणाम होतो आहे. बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठतेचा आजार जडल्याचं ऐकायला मिळतं. पण बद्धकोष्ठता असल्यास, काय खावं हे मात्र फार कमी लोकांना माहीत असतं. त्रास होत असतो त्यामुळं नक्की काय खावं त्याचा काय परिणाम होतो याची माहिती फारच कमी लोकांना असते. तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात फळांमध्ये चेरी, सफरचंद, पपया, आवळा हे खाणं गरजेचं आहे. तसंच भात, सोयाबीन, बटाटा, दुधी यांचा जेवणात समावेश असायला हवा. बद्धकोष्ठता असल्यास, काय खावं हे खास तुमच्यासाठी.

१. भात – भात पचायला सोपा असतो त्यामुळं आपल्या पचनाची समस्या भातामुळं दूर होते. शिवाय आपल्या शरीरात असणाऱ्या युरिक अॅसिडसारख्या विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळं तुम्हाला जर भात खायला आवडत असेल, तर तो खायचं तुम्ही सोडू नका. त्याशिवाय भातामुळं तुमची पचनक्रिया अतिशय उत्तम होते. रोज जर एक मूठ भात खाल्ला तर बद्धकोष्ठतेपासून सुटका होते.

- Advertisement -

२. सोयाबीन – बद्धकोष्ठतेसाठी सोयाबीन हे अतिशय पूरक मानले जाते. कारण यामुळं आतड्यातील मळ निघून जातो आणि तुमच्या शरीरातील मळ निघून गेल्यामुळं रक्ताचा योग्य स्रोत चालू राहते असं समजलं जातं. शिवाय यामुळं शरीराला प्रोटीन मिळतं.

३. बटाटा बटाट्यात असणारं फायबर आपल्या शरीरातील पचनशक्ती योग्य ठेवायला मदत करते. ज्यामुळं बद्धकोष्ठतेसारखा आजार होण्याची भीती राहात नाही. बटाटा बऱ्याच तऱ्हेनं तुम्हाला खाता येऊ शकतो. तुम्ही तो उकडून घ्या अथवा त्याची भाजी बनवा किंवा पराठे बनवा. बऱ्याच भाज्यांमध्ये बटाटा मिक्स करूनदेखील खाता येतो.

- Advertisement -

४. दुधी – दुधी ही भाजी पचायला अधिक सोपी आहे. यामध्ये पाणी आणि फायबरचं प्रमाण अधिक आहे. जे बद्धकोष्ठतेशी लढण्यास मदत करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -