हिवाळाच्या मोसमात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या दिवसांमध्ये पेरू खाण्याचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला खूप आरोग्यपूर्ण राहण्यास मदत करते. असेच काही पेरू खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
- पेरूमुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पेरू खाल्लानंतर पोट भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये जास्त शुगरचे प्रमाण असते.
- हृदयासंबंधी आजारांवर पेरू फळं खूप उपयुक्त ठरते. जेवणासोबत पेरूची चटणी आणि पेरूचा मुरब्बा तीन महिने खाणे हे हृदयासंबंधीत आजारांशी फायदेशीर ठरते.
- तसेच पेरू नियमित सेवन केल्याने रक्तासंबंधी विकारही दूर होतात.
- सात्विक गुणधर्माचा आणि बुद्धिवर्धक असा पेरू असल्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला तर मानसिक थकवा दूर होतो आणि ऊर्जा प्राप्त होते.
- पेरू त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतो. पेरूमध्ये फॉलिक अॅसिड, पोटॅशिअर, तांबे आणि मँगजीन धातू मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपन्या पेरूचा जास्त वापर करतात.
- तसेच पेरूच्या बिया चावून खाल्ल्याने शरिरातील लोहाची कमतरता भरून काढते. महत्त्वाचे म्हणजे पेरूतील लायकोपीन घटक कॅन्सर आणि ट्यूमरचा आजार दूर होण्यास मदत करते.