घरलाईफस्टाईलजाणून घ्या आमसूलचे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या आमसूलचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

जाणून घ्या आमसूलचे आरोग्यदायी फायदे.

दररोजच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि पदार्थाला आंबटपणा आणण्यासाठी बरेच जण टोमॅटोचा वापर करतात. तर काहीजण टोमॅटोला पर्याय म्हणून आमसूलचा देखील वापर करतात. चवीला आंबट असणारा हा पदार्थ कोकण, केरळ, गोवा या भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. कोकमचे फळ सुकून त्याच्या सालीपासून आमसूल बनवले जाते. याचे जेवणासह इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया आमसूलचे आरोग्यदायी फायदे.

वजन कमी करण्यासाठी

- Advertisement -

आमसूल हे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. आमसूसमधील एंटीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्तींने आमसूलचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.

साखरेचे प्रमाणा नियंत्रणात राहते

- Advertisement -

नियमित आमसूलचे सेवन केल्यास मधुमेहासारख्या आजारांवर मात करु शकाल. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी आमसूल फार उपयुक्त आहे.

पित्ताच्या त्रासावर रामबाण उपाय

आमसूल हे पित्तनाशक आहे. उन्हामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. अशावेळी आमसुलाचे सेवन करावे पित्ताचा त्रास कमी होतो.

हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर

आमसूलामध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये हे लाभदायक आहे. नियमित आमसुलाचे सेवन केल्यास हार्ट अटॅक सारख्या समस्येपासून बचाव होऊ शकतो.

डोळ्यांच्या आजारावर फायदेशीर

आमसूलामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ए आणि विटामिन ई असल्यामुळे डोळ्यांच्या आजारांवर फायदेशीर ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -