घरलाईफस्टाईलकांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

कांदा खाणे आरोग्यास फायदेशीर असते. त्यामुळे दररोज जेवणातून कांद्याचे सेवन अधिक प्रमाणात करा.

बऱ्याचदा जेवणाची चव वाढवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा कांदा खाल्याने तोंडाला दुर्गंधी येते. त्यामुळे अनेकदा कांदा खाण्यास नकार दिला जातो. परंतु, कांद्याच्या नियमित सेवनाने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

पचनशक्ती मजबूत होते

- Advertisement -

कांद्याचे सेवन केल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. त्यात अँटी – बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांमुळे ते खाल्ल्याने पचनशक्ती देखील सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

- Advertisement -

कांदे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच कांदा चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतो. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

केस गळणे थांबते

केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कांदा खूप प्रभावी आहे. कांद्याचा रस केसांवर मालिश केल्यास केस गळणे थांबते. याव्यतिरिक्त कांद्याची पेस्ट लावल्याने लहान वयात पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होते.

मूत्रपिंडाशी संबंधित आजार

लघवी थांबली तर दोन चमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन सांजा तयार करा. हा सांजा गरम झाल्यावर त्याची पेस्ट पोटावर लावल्यास लघवी सुरु होते. कांदा पाण्यात उकळवून ते पाणी पिण्यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील संपण्यास मदत होते.

संधीवात

हिरव्या कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-हिस्टॅमिन गुणधर्म देखील असतात. त्यामुळे कांदा हा संधिवात आणि दम्याच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -