घरलाईफस्टाईलहळदीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

हळदीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीपासून आपल्या शरीराकरता कोणते इतर देखील फायदे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.

सर्दी-खोकल्यापासून आराम

- Advertisement -

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध हा बहुगुणी घरगुती उपाय आहे. हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी करते तसेच दुधामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते

- Advertisement -

हळदीचे दूध प्यायल्यास रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते. तसेच हळदीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे विषारी घटक बाहेर पडतात.

turmeric milk
(फोटो प्रातिनिधिक आहे)

डोकेदुखी व अंगदुखी कमी होते

हळदीच्या दुधामध्ये ‘अ‍ॅन्टीऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

सांधे दुखी कमी होते

हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखी रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.

हेपॅटायटीसपासून आराम मिळतो

हळदीच्या दूधामध्ये अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातीची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा आघात कमी होतो.

शांत झोप लागते

झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात.

स्त्रियांना मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होतो

मासिकपाळीच्या पहिल्या दिवशी किंवा पाळीचे चक्र चुकल्यास अनेक स्त्रियांना तीव्र वेदना होतात. या समस्येपासून बचावण्यासाठी नेहमी हळदीचे दूध प्यावे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -