सणासुदीचा काळ जवळ आला असताना सर्वत्र गोड पदार्थ व मिठाईंचा स्वाद दरवळताना पाहायला मिळेल, ज्यामुळे गोड पदार्थ व मिठाईच्या सेवनामुळे कॅलरीमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे. पण या स्वादिष्ट पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजनामध्ये अनारोग्यकारक वाढ होऊ शकते, जे आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते.
वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यपदार्थ सेवनावर देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही यंदा सणासुदीच्या काळात कशाप्रकारे खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा याबाबत मार्गदर्शन करत आहोत, ज्यामुळे तुम्ही सणासुदीच्या काळाचा आनंद घेण्यासह आरोग्य देखील उत्तम ठेवू शकाल.
यंदा उत्सवी खाद्यपदार्थांना आरोग्यदायी करण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या टिप्स:
१. घरामध्ये गोड पदार्थ तयार करा
भारतीय सण साजरा करताना गोड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. प्रत्येकजण आपल्या आवडत्या गोड पदार्थाचा आस्वाद घेण्यास उत्सुक असतात. पण याबाबतीत मोठी समस्या म्हणजे बहुतांश मिठाई किंवा गोड पदार्थ स्टोअर्समध्ये बनवले जातात आणि त्यामध्ये साखर, फॅट, रिफाइन्ड पीठ व रंग मोठ्या प्रमाणात असतात. यंदा गोड पदार्थ खरेदी करण्याऐवजी प्रिमिअम उत्पादने व आरोग्यदायी पर्यायांचा वापर करत घरामध्ये स्वत:च्या आवडीचे गोड पदार्थ तयार करा. घरामध्ये गोड पदार्थ तयार करताना साखर व फॅटचा यांच्या वापरावर अधिक नियंत्रण असते. यामुळे तुम्ही कोणतीही चिंता न करता गोड पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
२. आरोग्यदायी स्नॅक्सचा आस्वाद घ्या
भोजनांदरम्यान आरोग्यदायी स्नॅक्सच्या सेवनामुळे भूकेचे शमन होण्यासह तुम्ही सक्रिय राहण्यास मदत होते, तसेच अनारोग्यदायी खाद्यपदार्थांच्या सेवनावर देखील नियंत्रण राहते. पण कार्यक्रम, पत्त्यांचे खळ किंवा पाहुणे घरी आले असताना सेवन केले जाणाऱ्या स्नॅक्समुळे कॅलरींचे प्रमाण वाढू शकते. अनारोग्यकारक स्नॅक्सऐवजी मीठ, साखर व फॅटचे कमी प्रमाण असलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. भाजलेले मखाना, भाजलेले चणे, ग्रॅनोला बार, ट्रेल मिक्स, खाखरा, बदाम आणि सुकामेवा इत्यादी काही रोस्टेड स्नॅक्स प्रकार आहेत.
३. आरोग्यदायी पर्यायांची निवड करा
तुम्ही संतुलित आहाराचे सेवन करत असाल तर तुमचे आवडते खाद्यपदार्थ व डेसर्ट्सचा आस्वाद घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की, अशा खाद्यपदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करता आरोग्याला पोषण मिळेल अशा स्वरूपात सेवन करा. पर्यायी घटकांचा वापर करा. लहान पर्याय देखील उत्तम आहे. उदाहरणार्थ, साखरेऐवजी मध किंवा गुळाचा वापर करा. तुमच्या रेसिपीमध्ये अनारोग्यकारक मैदाऐवजी गव्हाचे किंवा नाचणीचे पीठ यांसारख्या आरोग्यदायी पीठांचा वापर करा.
४. जेवण चुकवू नका
तुम्ही अधिक वेळ उपाशी राहत असाल तर अतिप्रमाणात सेवन कराल किंवा फॅटी, शर्करायुक्त खाद्यपदार्थांचे सेवन कराल. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे योग्य नाही. तुम्ही पौष्टिक ब्रेकफास्टचे सेवन करत दिवसाची सुरूवात करू शकता. तसेच ब्रेकफास्ट व्यतिरिक्त दिवसभरात आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा, ज्यामध्ये प्रथिने व फायबर उच्च प्रमाणात असतात. सामान्य नियम म्हणजे दर दोन ते तीन तासांनी किंवा गरजेनुसार आरोग्यदायी स्नॅकचे सेवन करा.
५. प्रत्येक आहारासह सलाडचे सेवन करा
सुट्ट्यांचा आनंद घेत असताना रात्रीच्या वेळी जेवण शिजवायला कंटाळा येऊ शकतो. कॅलरीचे सेवन संतुलित ठेवता येऊ शकते, अतिप्रमाणात खाण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि आरोग्यदायी, ताज्या सलाडचे सेवन करत तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते. ताज्या घटकांसह तयार केलेल्या सलाडमधून फायबर आणि आरोग्यदायी मिनरल्स मिळतात.
६. आरोग्यदायी पेय सेवन करा
अल्कोहोल भूकेला चालना देते आणि कॅलरी कमी करण्याचा स्रोत आहे. आपल्याला माहित आहे की, कॅलरींच्या अधिक प्रमाणामुळे शरीरामध्ये चरबी वाढते. एरेटेड आणि साखरयुक्त पेये सेवन करणे टाळावे. त्याऐवजी सुट्टीच्या हंगामादरम्यान ग्रीन टी, डिटॉक्स वॉटर, नारळपाणी, फ्रेश ज्यूस आणि मॉकटेल्स सेवन करा.
सुट्टीच्या हंगामादरम्यान आरोग्यदायी आहाराचे सेवन करण्याच्या खात्रीसाठी या सूचनांचे पालन करा.
(या लेखाचे श्रेय इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट श्री. अमोल नायकवडी यांना जाते.)