Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthवाढत्या प्रदुषणामध्ये लहान मुलांची अशी घ्या काळजी

वाढत्या प्रदुषणामध्ये लहान मुलांची अशी घ्या काळजी

Subscribe

वाढत्या वायु प्रदुषणामुळे आपले आरोग्य बिघडले जाते. अशातच तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांची या स्थितीत विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यांना खोकला, श्वास घेण्यास समस्या उद्भवू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्यास ते अधिक आजारी पडू शकतात. या स्थितीत मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स जाणून घेऊयात.

मुलांना प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल?
मुलांना प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना घराबाहेर जाताना मास्क घालण्यास सांगा. कारण मास्कशिवाय ते बाहेर गेल्यास हवेत असलेले धूलीकण त्यांच्या शरीरात जाऊ शकतात. हेच आजाराचे कारण ठरू शकते.

- Advertisement -

संतुलित आहार द्या
बदलत्या वातावरणामुळे आणि वायु प्रदुषणात मुलांच्या डाएटकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांना फूड्स देताना त्यांच्या खाण्यापिण्यात भाज्या आणि फळांचा अधिक समावेश करावा. त्याचसोबत त्यांना बाहेरचे फूड खाण्यास देऊ नका.

घराला प्रदुषण मुक्त ठेवा
जर प्रदुषण अधिक वाढले असेल तर घराच्या खिडक्या दरवाजे शक्यतो बंद करू ठेवा. घरात धूळ-माती येत असेल तर ती वेळोवेळी स्वच्छ करा. घरातील पडदे सुद्धा स्वच्छ ठेवा.

- Advertisement -

मुलांना हाइड्रेट ठेवा
नवाज बाळ असो किंवा लहान मुलं त्यांना हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक दोन तासांनी त्यांना पाणी पिण्यास द्या. जेव्हा मुलांचे ओठ ड्राय होतील तेव्हा त्यांच्या ओठांना पाणी किंवा क्रिम लावा. तर मोठ्या मुलांनी दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. जेणकेरून शरीरातील टॉक्सिंस बाहेर पडण्यास मदत होईल.

रोगप्रिकारक शक्ती वाढवा
मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही पोषक तत्त्वांची गरज असते. मुलांमधील रोगप्रतिराक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज करण्यास सांगा. त्याचसोबत मध, हळद आणि तुळशी सारख्या सुपरफूड्सचे सेवन करावे.


हेही वाचा- प्रदुषित वातावरणात अशी घ्या डोळ्यांची काळजी

- Advertisment -

Manini