हेल्दी राहण्यासाठी आपल्या डाएटमध्ये एखाद्या फळाचा समावेश करावा असा सल्ला दिला जातो. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार एखादे फळ खातो. याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. परंतु एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे अत्यंत वाईट असते. असेच काहीसे चिकू फळाबद्दल आहे. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक चीकूचे सेवन करता त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. चिकूचे अधिक सेवन केल्याने वजन वाढणे ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांचा सामना करावा लागतो. तर जाणून घेऊयात चिकूचे अधिक सेवन केल्याने काय नुकसान होऊ शकते.
दातांसंदर्भात समस्या
चिकूचे अधिक सेवन केल्याने दातासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. खरंतर चिकूमध्ये हाय शुगर कंटेट असतो जो दात किडणे, कॅव्हिटी आणि दातांच्या अन्य समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे सल्ला दिला जातो की, चीकू खाल्ल्यानंतर तुम्ही डेंटल हाइजीनकडे लक्ष दिले पाहिजे.
वजन वाढले जाते
जर तुम्ही चिकूचे अधिक खाल्ल्यास तर तुमचे वजन मेंटेन राहण्याऐवजी वाढले जाईल. चिकूमध्ये कॅलरी आणि नॅच्युरल शुगर अधिक असते. त्यामुळे वजन वाढले जाऊ शकते.
एलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते
काही लोकांमध्ये चिकूचे अधिक सेवन केल्यास एलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते. असे होऊ शकते की, ते खाल्ल्याने तुम्हाला हलकी खाज येणे, घसा सुजणे आणि त्वचेवर दाणे येणे याचा सामना करावा लागू शकतो. खरंतर चिकूमध्ये टॅनिन आणि लेटेक्स सारखे केमिकल कंपाउंड असतात जे एलर्जिक रिअॅक्शनला ट्रिगर करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला लेटेक्स एलर्जी असेल तर चिकू खाल्ल्याने एलर्जी होण्याची शक्यता असते.
पचनासंबंधित समस्या
चिकू मर्यादेपेक्षा अधिक खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडली जाऊ शकते. खरंतर यामध्ये डाइटरी फायबर भरपूर असतात. त्यामुळे याचे अधिक सेवन केल्याने मळमळ, सूज येणे, पोटात दुखणे अशा समस्या होऊ शकतात.
ब्लड शुगर वाढेल
चिकू मध्ये नैसर्गिक शुगर आणि फ्रुक्टोज असतात. जेव्हा याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरचा स्तर वेगाने वाढला जाऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर अधिक चिकूनचे सेवन करणे टाळले पाहिजे.
हेही वाचा- रात्री ड्राय फ्रुट्स खावेत का?