Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthआळस दूर करण्यासाठी जपानी लोक वापरतात 'ही' ट्रिक्स

आळस दूर करण्यासाठी जपानी लोक वापरतात ‘ही’ ट्रिक्स

Subscribe

जपान मधील लोक अॅक्टिव्ह लाइफस्टाइल जगण्यासाठी ओळखली जातात. यामागे काही कारणं सुद्धा आहेत. त्यामुळेच त्यांचे शरिर अधिक हालचाल करु शकते आणि फार थकत ही नाही. यामध्ये चालणे, सायकलिंग करणे, पारंपरिक प्रथा, संस्कृतीच्या नियमांचे पालन यांचा समावेश आहे. जर तुम्हाला आळस दूर करायचा असेल आणि सकारात्मकत बदल घडवून आणायचे असतील तर तुम्ही सुद्धा पुढील काही जपानी टेक्निक फॉलो करु शकता.

इकिगाई
आपले आयुष्य जगण्याचे उद्देश, आवड अशा काही गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आपल्या कामांमागे नेमक्या उद्देशांना भावनांना जोडणे आणि आपल्या मुल्यांसोबत जगणे.

- Advertisement -

काइजन
ही टेक्निक सातत्याने स्वत: मध्ये बदल घडवून आणणे आणि आळस दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे. काइजन ही एखादे काम पूर्ण करण्यासाठी एक महान जपानी टेक्निक मानली जाते. यामध्ये आळसावर नियंत्रण मिळवणे, काही महत्वाची पावले उचलण्यास प्रोत्साहन देतात. लहान टास्क पासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू कठीण समस्यांकडे वळा.

पोमोडोरो टेक्निक
तुम्हाला कमीत कमी २५ मिनिटांच्या आतमध्ये विभाजित करा. त्याला पोमोडोरोस असे म्हटले जाते. त्यानंतर एक लहान ब्रेक घ्या. असे केल्याने तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करता आणि आळस कमी होतो.

- Advertisement -

कानबन टेक्निक
आपली कामे आणि प्रगती ट्रॅक करण्यासाठी एक विज्युअल बोर्ड किंवा चार्ट तयार करा. आता तुम्ही कामे लहान लहान हिस्स्यांमध्ये वाटून घ्या. जेव्हा तुम्हाला तुमची प्रगती दिसेल तेव्हा आणखी प्रोत्साहित व्हाल आणि आळस ही दूर होईल.

कायकाकू
काही वेळेस बदल घडण्यासाठी किंवा एका नव्या दृष्टीकोनातून विचार केल्याने आळस दूर होतो. तुमच्यासाठी ही टेक्निक काम करते. याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कधीही वापर करु शकता.


हेही वाचा- Artificial Sweeteners चा अधिक वापर आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

- Advertisment -

Manini