घरCORONA UPDATEcovid-19 : शरीरात कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाचा खास टीप्स

covid-19 : शरीरात कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाचा खास टीप्स

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. यादरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. अनेक जण कोरोनाला रोखण्यासाठी आयुर्वेदीक काढा, औषधांचे सेवन करत आहे. तर व्हिटामीन- सीयुक्त फळे खाण्यावर भर देतात. दरम्यान हेल्थ एक्सपर्टसही कोरोनाविरोधात रोगशक्ती वाढवत असलेल्या गोष्टींवर अधिक भर देत आहेत. आयुष मंत्रालयाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही खास घरगुती उपाय लोकांना सुचवले आहेत. या उपायांना आयुर्वेदातही अधिक प्रभावी मानले जात आहे. जाणून घेऊया काय आहेत उपाय…

- Advertisement -

आयुष मंत्रालयाने शरारात इम्युनिटी वाढण्यासाठी दिल्या खास टीप्स

१) एका व्यक्तीने दिवसाभरातून जास्तीत जास्त ४५० ते ५०० ग्रँम ताज्या भाजा आणि फळांचे सेवन करा.

२) तसेच जेवण्यात जास्तीत जास्त धान्यांचा वापर करा.

- Advertisement -

३) स्थानिक पातळीवर उत्पादित, वितरीत होणाऱ्या पदार्थांचा निवड करा.

४) तसेच शरीरात फॅट तयार करणाऱ्या तेलाचा वापर टाळा. दिवसाला ३० ग्रॅमपेक्षा अधिक फॅट वाढवणारे तेल वापरणे टाळा. खाण्यात दोन प्रकारचा तेलाचा वापर करा.

५) तसेच खाण्यात मोठ्याप्रमाणात ड्रायफ्रुटस, हिरव्या भाजा आणि धान्यांचा समावेश करा. यात बदाम, काजू, मणुका, अक्रोड, यांचा वापर करा. त्याचबरोबर धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका आणि इतर कडधान्यांचा समावेश करा, तर हिरव्या भाज्या आणि फळांचेही सेवन करा.

६) या पदार्थ्यांचा सेवनामुळे आपल्या शरीरात मायक्रो न्युट्रिन्टचे प्रमाण वाढण्यास मदत होते, तसेच शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुरुवात होते,

७) तसेच आहारात मासं, मच्छी, मटनाचा समावेश केल्यास कोरोनाचा कोणताही धोका निर्माण होत नाही. परंतु हे मासांहारी पदार्थ खाण्यापूर्वी नीट धुवून. स्वच्छ करत शिजवून खावे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -