Saturday, March 15, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : पाळी नियमित करण्यासाठी करा हा उपाय

Health Tips : पाळी नियमित करण्यासाठी करा हा उपाय

Subscribe

मासिक पाळी वेळेवर न येणं ही अनेक महिलांसाठी चिंतेची बाब असू शकते. यामागे हार्मोनल इंम्बॅलेन्स हेही कारण असू शकतं. तर काही वेळा ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकलेल्या वेळा आणि अनियमित लाइफस्टाईलमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. काही वेळा महिला या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. परंतु पाळी वेळेवर येणे हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. सामान्यत: पाळीचे चक्र हे अठ्ठावीस दिवसांचे असते. जर हे अंतर 21 दिवसांपेक्षा कमी आणि 35 दिवसांपेक्षा जास्त असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधीकधी पाळीच्या दिवसांमध्ये उतार- चढाव होत असेल तर ही सामान्य गोष्ट आहे. परंतु हे सारखं सारखं होणं चांगलं नाही. जर तुमची पाळी नियमित नसेल तर काही घरगुती उपाय आणि योगासने याला नियमित बनवू शकतात.

आज आपण जाणून घेऊयात अशा चहाविषयी जो चहा पाळी नियमित करण्यासाठी मदत करू शकेल.

दालचिनीचा गुणधर्म गरम असतो. हे शरीरातील गरमी वाढवते. आणि यामुळे पाळीही वेळेवर येते.
दालचिनी, इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते. हार्मोनल बॅलेन्स यामुळे सुधारला जातो. हे पाळीच्या दरम्यान होणारी हेवी ब्लीडिंग, दुखणं आणि गुठळ्या कमी करते.
केसर हार्मोन्सला बॅलेन्स करण्याचे काम करते. आणि पाळीच्या दरम्यान होणारा त्रास आणि पोटात येणारे पेटके कमी होतात. हे पाळीला नियमित करण्यासाठी फायदेशीर ठरते.
केसरामध्ये अँटि-इंफ्लेमेटरी आणि अँटि-स्पास्मोडिक गुण असतात. हे पाळी नियमित करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
चेस्टबेरी टी, प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या लेव्हलला सुधारते. यामुळे इंफ्लेमेशन कमी होते आणि पाळी नियमित होऊ शकते. पाळीचं चक्र नियमित राहण्यासाठी शरीरात एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी योग्य असणं गरजेचं असतं.

हिरवी वेलची, इंफ्लेमेशनला कमी करते. यामुळे आरोग्यही सुधारते.

चहा बनवण्याची पद्धत :

साहित्य :

चेस्टबेरी चहापावडर – 1 टीस्पून
दालचिनी पावडर – चुटकीभर
केसर – 2 ते 3 काड्या
वेलची- 1 ते 2

कृती :

सगळ्या पदार्थांना अर्ध होईपर्यंत उकळून घ्या.
आता या पदार्थांना गाळून घ्या.
हा चहा ल्यूटियल फेजमध्ये प्या.
ही फेज ओव्युलेशनच्या लगेच नंतर म्हणजेच पाळीच्या 15 दिवसांनंतर सुरू होते.

हेही वाचा : Diwali Safety Tips : दिवाळी बनवा हॅप्पी या सोप्या सेफ्टी टिप्सनी


Edited By – Tanvi Gundaye

Manini