निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. व्यायामामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते. परंतु गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता जिममध्ये व्यायाम करताना लोक हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडले आहेत. असे म्हटले जाते की जास्त व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हेवी वर्कआउटमुळे खरोखरच हृदयावर दबाव येतो का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
जास्त व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले हृदय जलद गतीने धडधड करू लागते आणि जास्त रक्त पंप करते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करू लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषतः जर एखाद्याच्या धमन्या आधीच ब्लॉक झाल्या असतील, तर ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आणखी वाढू शकते. याशिवाय, जास्त व्यायामामुळे कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिस नावाच्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. या आजारात, हृदयाच्या धमन्यांमध्ये आणि वर चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे धमन्या अरुंद होऊ शकतात. आणि त्यातून कमी रक्तप्रवाह वाहू लागतो.
कोणत्या लोकांना धोका जास्त?
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, व्यायामामुळे सर्वांनाच हृदयविकाराचा धोका नसतो. मात्र काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जसे की,उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हेवी वर्कआउट करणे कठीण असू शकते कारण त्यामुळे हृदयावर दबाव वाढतो. याशिवाय, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या हृदयाच्या धमन्या कमकुवत असतात, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. स्थूल असलेल्या व्यक्तींच्या जास्त वजनामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे व्यायामादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जे लोक धूम्रपान करतात आणि जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्या रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो .40 ते 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी उच्च तीव्रतेचे व्यायाम करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
व्यायामादरम्यान हृदयविकाराची इतर कारणे
अचानक हेवी वर्कआउट करणे.
डिहायड्रेशन –
पाण्याअभावी रक्त जाड होऊ शकते, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
ओव्हरट्रेनिंग –
विश्रांती न घेता सतत हेवी वर्कआउट करणे देखील शरीरासाठी हानिकारक आहे.
हेही वाचा : Fashion Tips : या ड्रेसवर स्टोन नेकलेस करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye