मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी काही खास पेये प्यायल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. साधारणपणे असे दिसून येते की लोक सकाळी उठतात आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. मात्र यातून त्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही खास पेये सेवन केल्यास त्याचे बरेच फायदे मिळू शकतात.
लिंबू पाणी आहे बेस्ट :
लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी मदत होते. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास ते खूप फायदेशीर ठरते. तुमच्या शरीरात ऊर्जा असते आणि तुम्हाला चरबी कमी करण्यास लिंबूपाणी मदत करते. लिंबू पाण्यामुळे तुमच्या शरीरात कमजोरपणा येत नाही. याशिवाय, तुमच्या त्वचेसाठी आणि हृदयासाठी लिंबूपाणी हे खूप चांगले पेय आहे.
ग्रीन टी आहे फायदेशीर :
ग्रीन टी प्यायल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स मिळतात जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. चहापेक्षा ग्रीन टी खूप चांगला आहे. ग्रीन टीचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी चहा प्यायल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ग्रीन टीचा समावेश करू शकता.
नारळ पाणीही आवश्यक :
नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढते. यासोबतच हे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवते. मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी आणि नंतर नारळ पाणी प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. हे तुमच्या यकृतासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
आवळा रसाला पर्याय नाही :
आवळ्याचा रस प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आवळा बारीक करून त्याचा रस तुम्ही तर काढू शकता. हे प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व घाण निघून जाते. तुमचे रक्त देखील फिल्टर केले जाते. हे बदल साध्य करण्यासाठी, तुम्हाला ही पेयं नियमितपणे प्यावे लागतील आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करावे लागेल.
हेही वाचा : Winter Health : थंड पाण्याने आंघोळ करण्याची योग्य पद्धत
Edited By – Tanvi Gundaye