Thursday, January 2, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : फोनच्या अतिवापरामुळे कमी होऊ शकते पचनशक्ती

Health Tips : फोनच्या अतिवापरामुळे कमी होऊ शकते पचनशक्ती

Subscribe

मेटाबॉलिझ्म म्हणजे पचनशक्ती, ही शरीरातील पेशींमध्ये होणारी अशी केमिकल प्रक्रिया आहे जी आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करते. चालण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि शरीरातील अनेक क्रिया पार पाडण्यासाठी या ऊर्जेचा वापर केला जातो. परंतु आजच्या काळात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक मेटाबॉलिझ्मच्या समस्यांचे शिकार बनले आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण या समस्या होण्यामागील एक कारण आहे ते म्हणजे मोबाईलचा अतिवापर. फोन वापरल्याने पचनशक्ती कशी मंदावते ते समजून घेऊयात.

फोनच्या अतिवापराचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम :

५० मिनिटे मोबाईल फोन वापरल्याने मेंदूमध्ये असणारे ग्लुकोज शरीरातील पचनसंस्थे वर परिणाम करते. ग्लुकोज मेटाबॉलिझ्म ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी ग्लुकोजचा वापर करते. जेव्हा मेंदूच्या ग्लुकोज मेटाबॉलिझ्म वर परिणाम होतो, तेव्हा त्याचा परिणाम ऊर्जा पातळी कमी होणे, मानसिक थकवा येणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.

- Advertisement -

डिजिटल उपकरणे निळ्या रंगाचा प्रकाश सोडतात ज्याला आपण ब्लू लाईट म्हणतो. त्याचा मानवी शरीरावर खोलवर परिणाम होतो. हा प्रकाश आपल्या सर्केडियन रिदमवर परिणाम करतो. सर्कॅडियन रिदम हे आपल्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ आहे जे आपण कधी झोपतो आणि कधी जागे होतो हे ठरवण्यासाठी मदत करते. जेव्हा आपण रात्री उशिरा मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारचे डिजिटल उपकरण वापरतो तेव्हा ते आपली नैसर्गिक झोप बिघडवू शकते.

जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा ते आपल्या शरीराची मेटाबॉलिझ्म प्रक्रिया हळू होऊ लागते ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही.यामुळे वजन वाढण्यासह मानसिक समस्या देखील निर्माण होतात .

- Advertisement -

या समस्येपासून कसे वाचाल ?

यासाठी मोबाईलचा अतिवापर हा कमी करायला हवा. यासाठी थोड्या थोड्या वेळाने मोबाईलपासून ब्रेक घ्या.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करण्याकडे लक्ष द्या.
जेणेकरून शरीराला ऊर्जेची गरज भागण्यासाठी आणखी पोषकतत्त्वांची गरज लागेल. आणि त्यासाठी भूक लागण्याचे प्रमाणही वाढेल.

हेही वाचा : Winter Fashion : हिवाळ्यात वुलन कुर्तीसोबत ट्राय करा या दुपट्टा डिझाईन्स


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini