पावसाळ्यात कोरोनासोबत इतर आजारांची कशी घ्याल काळजी?

health tips for monsoon
पावसाळ्यात कोरोनासोबत इतर आजारांची कशी घ्याल काळजी?

उन्हाळ्यापासून सुटका मिळावी यासाठी पावसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण कोसळणाऱ्या सरी या सर्वांनाच हव्या हव्याश्या वाटत असतात. सर्वांनाच हवेतील गारवा अनुभवायचा असतो. पण, या गारव्यासोबत इतरही रोग, जंतू वाढत असतात. त्यामुळे काळजी तितकीच काळजी घेणेही महत्त्वाचे असते. सध्या पाहिला गेले तर कोरोनाची देखील महामारी आहे. यात इतर आजारांशी देखील सामना करणे फार गरजेचे आहे. अशावेळी नेमके काय करावे? पाहुया.

पावसात भिजू नका

बऱ्याच जणांना पावसात भिजायला आवडते. पण, शक्यतो पावसात भिजणे टाळा. कारण पावसात भिजल्याने व्हायरल इन्फेक्शन होते. तसेच ताप, सर्दी, डोके दुखी या समस्या उद्धवतात. त्यामुळे पावसात भिजू नये.

थंडगार पदार्थ खाऊ नये

पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या काळात हलके पदार्थ खावेत. तसेच थंड पेयांचे सेवन करु नये. यामुळे ताप, सर्दीला आमंत्रण मिळते.

बाहेरचे पदार्थ खाणे टाळा

बऱ्याचदा बाहेर पाऊस पडल्यानंतर बाहेरचे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, कारण या पदार्थांवर अनेक जंतू असण्यासाची शक्यता असते. त्यामुळे आजारपण लवकर येऊ शकते.

हाय प्रोटीन डाएट घ्या

पावसाळ्यात प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. दुध, अंडी, मासे, मांसाहारी पदार्थ, पनीर, विविध प्रकारच्या डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, काजू यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

मास्कचा वापर करा

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क वापरणं आणि हात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे पावसळ्यातही बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. तसेच बाहेर जाताना एक्सट्रा मास्क बरोबर ठेवणे गरजेचे आहे. पावसामुळे मास्क ओला किंवा दमट झाल्यास लगेच बदलावा. कारण दमट ठिकाणी विषाणू वाढतात.


हेही वाचा – झटपट करा केळी आणि सफरचंदाची स्मुदी