घरलाईफस्टाईलHealth Tips : थंडीच्या दिवसांत मूठभर चणे खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे

Health Tips : थंडीच्या दिवसांत मूठभर चणे खाल्ल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Subscribe

आरोग्यासाठी चणे हे खूप फायदेशीर मानले जातात. कारण भिजवलेल्या चण्यात मोठ्याप्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॉल्शियम, आयरन आणि अनेक व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. भिजवलेले चणे खाल्ल्याने ब्लड शुगर आणि डायबिटीज नियंत्रणात येते. याशिवाय हाडांना बळकटी मिळते. ह्रदयासाठी देखील भिजवलेले चणे फायदेशीर मानले जातात.

वजन कमी करण्यास होते मदत

भिजवलेल्या चण्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्याप्रमाणात असते. यामुळे कॅलरीस कमी करण्यास मदत होते. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत

- Advertisement -

डायबिटीजच्या रुग्णांसाठी चणे फायदेशीर

भिजवलेल्या चण्यांमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना नेहमी भिजवलेले चणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

पचनसंस्था होते बळकट

भिजवलेले चणे पाचन तंत्र देखील मजबूत बनवतात. चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबरअन्न पचवण्याचे कार्य प्रमुख कार्य करते. भिजवलेले चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते शिवाय पोटासंबंधीत विकार किंवा गॅस, अपचनाची समस्या दूर होते.

- Advertisement -

इम्यूनिटी बूस्टरचे करते काम

भिजवलेल्या चण्यामध्ये अँटीऑक्सिडेट आणि व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे चणे शरीरास फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. यामुळे इम्युनिटी पावर वाढवण्यासही मदत होते.


worli gas cylinder blast : वरळीतील गॅस सिलेंडर दुर्घटनेतील ‘त्या’ चार महिन्याच्या मुलाचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -