Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealth'हे' पदार्थ सतत गरम केल्यास होतात विषारी

‘हे’ पदार्थ सतत गरम केल्यास होतात विषारी

Subscribe

अनेकांना गरमा-गरम जेवण खाण्याची आवड असते, असं म्हणतात की गरमा-गरम जेवण गार जेवणाच्या तुलनेत रूचकर लागते. त्यामुळे अनेकजण जेवताना पुन्हा-पुन्हा जेवण गरम करून खातात. परंतु तुम्हाला माहित आहे का? जेवण सारखं गरम करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरंतर जेवणाआधी तुम्ही सारखं जेवण गरम करत असाल तर त्या जेवणामध्ये हळूहळू विष तयार होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला फुड पॉयजनचा सामना करावा लागू शकतो. तसेच इतर अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावं लागू शकते.

‘हे’ पदार्थ सतत गरम करु नका

  • पालक


पालकची भाजी कधीही सारखी सारखी गरम करू नका, कारण यामध्ये नायट्रेटची पातळी जास्त असते. जे जास्त गरम केल्याने त्यात घातक विष तयार होते.

- Advertisement -
  • अंडी


अंडी कधीही सारखी उकडू नये. म्हणजेच एकदा उकडलेले अंडे दुसऱ्यांदा उकडू नका. शिवाय अंड्याला कधीही जास्तवेळ उकडू नका.

  • बीट


बीट हे एक कंदमुळ असून यामध्ये नायट्रेट उपलब्ध असते, याला सारखे गरम केल्याने यामध्ये विष तयार होऊ शकते. जे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

- Advertisement -
  • चिकन

Authentic Chicken Curry (Easy Chicken Salan) | Blogचिकनमध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आढळते. सारखे सारखे गरम केल्यास चिकनमध्ये टॉक्सिक तयार होते.

  • मशरूम


मशरूम कधीही पुन्हा पुन्हा गरम करू नका, मशरूममध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे ते जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेऊ नये.

  • उकडलेला बटाटा

How To Boil Potatoes

 

अनेकजण उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करतात. परंतु असं करणं देखील आरोग्यास घातक आहे.

 

 


हेही वाचा : 

पिझ्झा, बर्गर, मॅगी सतत खाणं लहान मुलांसाठी ठरु शकतं घातक

- Advertisment -

Manini