लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी उपवास, जीम , व्यायाम केला जातो. पण, अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. लठ्ठपणाची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, बदलती लाइफस्टाइल, हार्मोनल असंतुलन अशी कारणे असू शकतात. त्यामुळे आज आम्ही तज्ञांच्या मते, आहारातील असे कोणते पदार्थ पदार्थ आहेत, जे वजन वाढीस कारणीभूत ठरतात हे सांगत आहोत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार वजन वाढण्यासाठी रिफाइंड तेल कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रिफाइंड तेलापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळायला हवे.
रिफाइंड तेलामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी, शरीरातील निरोगी चरबी कमी होते आणि वजन झपाट्याने वाढते.
जर तुम्ही रिफाइंड तेलातील पदार्थ वारंवार खाल्लेत तर शरीरावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आहारात आरोग्यदायी पदार्थाचा समावेश करावा.
प्रिझर्व्हटिव पॅकेज्ड फूडही शरीरासाठी हानिकारक ठरते. प्रिझर्व्हटिव पॅकेज्ड फूडमध्ये मीठ, साखर आणि फॅट्स आढळतात. त्यामुळे असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात आणि वजन वाढण्यासही कारणीभूत ठरतात.
वजन वाढण्याला चिप्स, बिस्कीट्स आणि इतर पॅकेज फूडही कारणीभूत ठरतात.
चिप्स, बिस्कीट्स सारखे पदार्थ स्नॅक्स म्हणून खाल्लास वजन झपाट्याने वाढते आणि कमी होणे कठीण होते.
पॅकबंद पदार्थामध्ये उच्च कॅलरीज असतात. त्यामुळे पॅकबंद पदार्थाच्या सेवनाने लठ्ठपणा तर वाढतोच शिवाय डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोकाही निर्माण होतो.
बाहेरील उघड्यावरील पदार्थ वजन वाढीस कारणीभूत ठरतात. या पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात तेल आणि मसाले असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी बाहेरील पदार्थ खाणे टाळायला हवे.
जास्त साखरही लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. साखरेमध्ये जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे लठ्ठपणा टाळण्यासाठी साखरयुक्त पदार्थ खाणे टाळायला हवे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde