भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खाताय? पण ‘या’ पदार्थांनी वाढतेय वजन

भारतीय खाद्य संस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्हाला आवडत असले तरी त्यामुळे तुमचे वजन खूप वाढू शकते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत जाणून घेऊ.

health tips know indian food desi items reason for weight gain
भारतीय खाद्य पदार्थ आवडीने खाताय? पण या देसी पदार्थांनी वाढतेय वजन

भारतीय जेवण हे सर्वोत्तम मानले जाते. चवीने परिपूर्ण असलेले या जेवणाने तुमचे पोट तर भरतेच पण यातून तुम्हाला एक वेगळा आनंदही मिळतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय या जेवणाशिवाय जगू शकत नाही. भारतात खूप वेगवेगळे चवीचे, रंगाचे पदार्थ आहे त्यामुळे कुठेही असलात तरी त्या राज्यातील देसी पदार्थ खाण्यापासून स्वत:ला रोखता येत नाही. निरोगी आणि तंदुरुस्त शरीर हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी यात भारतीय अन्नाचाही आहे. पण या दोघांमध्ये समतोल साधला पाहिजे. आपण अनेक भारतीय पदार्थ खाणं थांबवू शकत नाही पण फिटनेसही सोडू शकत नाही. दरम्यान भारतीय खाद्य संस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्हाला आवडत असले तरी त्यामुळे तुमचे वजन खूप वाढू शकते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत जाणून घेऊ.

1. नान

नान हा मैद्यापासून बनवला जातो. यात तुम्ही विचार करता की जास्त कॅलरी असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे नान न खाता चपाती किंवा तंदुरी रोटी खा. तसेच रोटीवर दही टाकून खा.

2. समोसा

समोश्यामध्ये एकाच वेळी अनेक भाज्या असतात. तसेच तो तेलात तळला जातो. त्यामुळे समोस्यामुळेही तुमचे वजन वाढू शकते.

3. पुरी किंवा भटुरे

सर्वांना तळलेले पदार्थ खायला आवडतात, पण पुरी किंवा भटुरे खाल्ल्याने तुमच्या डायटमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे हे तेलात तळलेली पुरी किंवा भटुरे तुमच्या फिटनेससाठीही चांगले असू शकत नाही.

4. सूजी किंवा मूग डाळ हलवा

सूजी किंवा मूग डाळ हलवा सर्वांनाच आवडतो, पण त्यातही मोठ्याप्रमाणात तेल, तूप आणि साखर असते. त्यामुळे वजन खूप वाढू शकते.

5. पराठे

पराठेही अनेक जण आवडीने खातात. पण या पराठ्यांमध्ये वापरलेले बटाटे, लोणी यात मोठ्याप्रमाणात कॅलरीज असते ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

6. सांबार, पुदिना चटणी आणि मेदू वडा

दक्षिण भारतीय नाश्ता आरोग्यास योग्य मानला जातो. यात सांबार, पुदिना चटणी आणि मेदू वडा हे चवीला चवदार लागते. पण हे सर्व डाळींपासून बनवले जाते. तसेच तेलात तळले जाते. त्यामुळे पचायला जड असलेले या पदार्थांमुळे वजन वाढू शकते.

7. मॅगी

दोन मिनिटांत बनणारी मॅगी अनेकांसाठी एक जेवण झाली आहे. मात्र सीलबंद मसाला आणि तळलेले नूडल्स असलेली ही मॅगी आरोग्यासाठी योग्य नाही, त्यामुळे मॅगी टाळा आणि त्याऐवजी ओट्स खाण्याचा प्रयत्न करा.


Vastu Tips : तुमच्या पाकिटातील ‘ही’ गोष्ट आजच काढून टाका; नाहीतर होईल नुकसान