Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : टीनएजमध्येही होऊ शकतो PCOS

Health Tips : टीनएजमध्येही होऊ शकतो PCOS

Subscribe

बदलती जीवनशैली आणि जेवणाच्या वाईट सवयींमुळे PCOS ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. यामुळे अनियमित मासिक पाळी, हार्मोनल इंम्बेलेन्स अशा अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु तुम्हाला माहित आहे का PCOSची समस्या फक्त महिलांनाच नव्हे तर टीनएजमधील मुलींनाही होऊ शकते.

कमी वयातील मुलींना जेव्हा वर्ष-दोन वर्षाआधीच पाळी सुरू होते तेव्हा अशा परिस्थितीत त्यांना PCOS होऊ शकतो. टीनएज मुलींमधील PCOSची सुरुवातीची लक्षणं काय असतात याबद्दल जाणून घेऊयात.

टीनएज म्हणजेच किशोरवयातील मुलींमध्ये PCOSची लक्षणं ओळखणं थोडं कठीण जाऊ शकतं. कारण यादरम्यान मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. ज्यामुळे PCOSची लक्षणं ओळखणं अवघड असतं.

टीनएजमध्ये PCOS ची लक्षणं काय असतात ?

टीनएजमध्ये जेव्हा मासिक पाळीची सुरुवात होते तेव्हा काही मुलींमध्ये सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये अनियमित मासिक पाळीची समस्या निर्माण होते. परंतु हीच समस्या जर दीर्घकाळासाठी तशीच राहिली तर हे PCOSचे लक्षण असू शकते. हार्मोनल इंम्बेमलेन्समुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. व त्यामुळे अनियमित पाळीची समस्या उद्भवते.

पोटाच्या भागावर विनाकारण फॅटस वाढणं, वजन वाढणं हीदेखील PCOSची लक्षणं असू शकतात. हेल्दी खाण्याच्या सवयी आणि नियमित शारीरिक हालचाली व व्यायाम करुनही कधीकधी PCOSमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मुलींना अडचणी येतात.

इन्सुलिन रेजिस्टंसच्या कारणामुळेही वजन वाढू शकते. ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात. ज्यामुळे रक्तातील साखर आणि फॅट वाढू लागतं.

हार्मोनल इंम्बेलेन्समुळे एक्ने, ऑयली स्कीन आणि शरीरावरील केस वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.

Health Tips: PCOS can also occur in teenagers

लक्षणं लवकर ओळखणे का गरजेचे ?

PCOSचा वेळीच इलाज झाला नाही तर इन्सुलिन रेजिस्टंस वाढू शकतं. ज्यामुळे एका विशिष्ट वयानंतर टाइप 2 च्या डायबिटीसचा धोका वाढतो. PCOS मुळे कोलेस्ट्रॉल लेव्हलवरही परिणाम होतो. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे आजार आणि रक्तदाबाची समस्याही निर्माण होते.

PCOS मुळे किशोरवयीन मुलींमध्ये एंझायटी, डिप्रेशन आणि इटिंग डिसऑर्डरच्या समस्याही निर्माण होतात. PCOSच्या शारीरिक लक्षणांप्रमाणेच मानसिक लक्षणंही दिसतात. यासाठीच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. PCOSची लक्षणं लवकर ओळखल्यास दीर्घकाळासाठी होणारे त्रास कमी केले जाऊ शकतात. जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करुन आणि मेडिकल ट्रीटमेंट घेऊन या लक्षणांना कमी केलं जाऊ शकतं.

हेही वाचा :


Edited By – Tanvi Gundaye

 

Manini