घरलाईफस्टाईलडायबिटीज रुग्णांसाठी दिलासा, ब्लड टेस्ट न करताही समजणार शुगर लेवल

डायबिटीज रुग्णांसाठी दिलासा, ब्लड टेस्ट न करताही समजणार शुगर लेवल

Subscribe

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना रक्तातील शुगरचे प्रमाण नियमित तपासण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या तपासणीमुळे शरारीतील मधुमेहाचे प्रमाण किती आहे हे समजते. मात्र ही तपासणी करण्यासाठी रुग्णाला ग्लुकोमीटरच्या साहाय्याने हाताच्या बोटावर सुईने टोचले जाते आणि रक्ताचे नमुने घेतले जातात. मात्र सतत बोटांवर टोचून रक्त घेण्याची ही प्रक्रिया रुग्णासाठी अत्यंत वेदनादायी ठरत आहे. मात्र या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. ज्यामुळे रुग्णाला रक्त घेण्यासाठी सतत बोटांवर सुई टोचण्याची गरज भासणार नाही.

लाळेतून चेक करा ब्लड शुगर

ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी ब्लड शुगर तपासण्यासाठी अशी एक पट्टी तयार केली आहे. या पट्टीच्या साहाय्याने तोंडातील लाळेचे नमुने घेत रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाईल. यामुळे सुईमुळे होणाऱ्या वेदनेपासून मुक्ती मिळणार आहे.

- Advertisement -

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी बोट ग्लूकोमीटर चिकटवून रक्ताचा थेंब घ्यावा लागतो. या प्रक्रियेत रुग्णांना बर्‍याच वेळा वेदनादायी अनुभवातून जावे लागते. या वेदना टाळण्यासाठी बरेच रुग्ण चाचणी पुढे ढकलतात.

कोणत्याही वेदना होणार नाहीत

ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पॉल दस्तूर यांचे म्हणणे आहे की, या नव्या चाचणी पद्धतीत एंजाइम एम्बेड केलेले आहे. यामुळे ट्रान्झिस्टरमध्येच शरीरातील ग्लूकोजची ओळखलं पटली जाते आणि शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण समजते. या चाचणीदरम्यान रुग्णास कोणत्याही वेदना होणार नसून अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना चांगले परिणाम मिळण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

व्यक्तीच्या तोंडातील लाळेत ग्लुकोज असते. या ग्लुकोजच्या मदतीने रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजणे सहज शक्य होते. सहज सोप्पी वापरता येणारी ही चाचणी इतर स्टँडर्ड ग्लुकोज ब्लड टेस्टपेक्षाही १०० टक्के परिणामकारक आहे. प्रिंटिंगच्या माध्यमातून ही चाचणी केली जाते. सध्या या चाचणीचे क्लिनिकल ट्रायल्स सुरु असून जर ही चाचणी क्लिनिकल्ट ट्रायलमध्ये यशस्वी ठरली तर त्यावर काम सुरू होईल. या चाचणीच्या मदतीने व्यक्ती कोरोना, एलर्जेन, हार्मोन्स आणि कर्करोगाची तपासणीही करु शकणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -