Sunday, January 12, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : या टिप्सने रहा डिजिटल बर्नआऊटपासून दूर

Health Tips : या टिप्सने रहा डिजिटल बर्नआऊटपासून दूर

Subscribe

सध्याच्या जगात स्क्रिनचा वापर न करणं म्हणजे जवळजवळ अशक्य झाले आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपल्या फोनमध्ये अनेक नोटिफिकेशन्स वाजू लागतात. ऑफिसमध्ये स्क्रीनवर सतत काम करण्यापासून ते झूम मिटींगपर्यंत सगळ्याच गोष्टींमुळे आपल्याला मानसिक थकवा येतो. इतकेच नव्हे तर मनोरंजनासाठीही आपण स्क्रीनवरच अवलंबून असतो. रात्री झोपण्यापूर्वीही अनेकांचा शेवटचं काम हेच असतं की सोशल मिडिया अॅप्सवर त्यांना वेळ घालवायचा असतो. यामुळे पूर्ण दिवस हा स्क्रीनवरच जातो. परंतु सततचा स्क्रीन टाईम हा डिजिटल बर्नआऊटचे कारण ठरू शकतो. ज्यामुळे तुम्हाला मूड स्विंग्स, थकवा, प्रोडक्टिव्हिटी कमी होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहणे तर अजिबातच शक्य नाही. परंतु या डिजिटल बर्नआऊटपासून मात्र आपण स्वत:ला थोड्याफार प्रमाणात वाचवू शकतो. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

स्वत:ला डिजिटल डिटॉक्स करा :

डिजिटल बर्नआऊट दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वत:ला डिजिटल डिटॉक्स करणं. यासाठी तुम्ही काही वेळाकरता स्क्रीनपासून ब्रेक घेऊ शकता. यामुळे मेंदूला थोडी शांतता मिळते. आणि तुम्हाला प्रसन्न वाटू लागतं. अशावेळी अशी काही कामं करा जी पूर्णपणे स्क्रीन फ्री असतील. तुम्ही वाटल्यास वॉकला जाऊ शकता किंवा कुकिंग करू शकता किंवा नॅपही घेऊ शकता.

- Advertisement -

खऱ्या जीवनाशी कनेक्ट करा :

डिजिटल बर्नआऊटचे मु्ख्य कारण म्हणजे आपण सर्वांनी आपलं आयुष्य स्क्रीनपर्यंतच सीमित केले आहे. शॉपिंगपासून ते मित्रांशी बोलण्यापर्यंत आपण नेहमीच स्क्रीनचा वापर करतो. ज्यामुळे त्याचा वापर आता गरजेपेक्षा अधिक होऊ लागला आहे. परंतु हे जाणून घेणे गरजेचे आहे की सोशल मिडिया आणि सोशलायजिंग यात फरक आहे. डिजिटल बर्नआऊट दूर करण्यासाठी तुम्ही मित्रमैत्रिणींना मेसेज करण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा. कु़टुंबियांसमवेत वेळ घालवा. सोशल मीडियाचा कमी वापर केल्याने मूड आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं.

Health Tips : Stay away from digital burnout with these tips

- Advertisement -

20-20-20 चा नियम पाळा :

डिजिटल बर्नआऊट थांबवण्याची ही एक चांगली पद्धत आहे. जसं की तुम्हाला माहित आहे पूर्ण दिवस स्क्रीनवर पाहून डोळे थकून जातात. यासाठीच 20-20-20 नियम पाळायला हवा. यासाठी प्रत्येक 20 मिनिटांनी, 20 सेकंदाकरता 20 फूट दूरपर्यंत पहा. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो. तुम्ही हा नियम फॉलो करण्यासाठी टायमर देखील सेट करू शकता. अगदी पाणी पिण्यासाठी उठणं हेदेखील मिनी ब्रेकसारखंच आहे.

चांगली झोप घ्या :

डिजिटल बर्नआऊट दूर करण्यासाठी झोप ही एका औषधाप्रमाणे काम करते. स्क्रीनची ब्लू लाइट तुमची झोप खराब करू शकते. कारण डिजिटल बर्नआऊटमुळे तुमच्या शरीरातील हार्मोन अर्थात मेलाटोनिनला कमी करते. यासाठीच चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही स्क्रीन पाहत असाल तर ब्लू लाइट-ब्लॉकिंग ग्लासेसचा वापर करू शकता. याशिवाय आपल्या बेडरूममध्ये स्क्रीन फ्री झोन तयार करा. झोपण्यापूर्वी फोन स्क्रोल करण्याऐवजी मेडिटेशन करा.

हेही वाचा : Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील ही योगासने


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini