मॉर्निंग वॉकसाठी जाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजले जाते परंतु जर तुम्ही काही चुका केल्या तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मॉर्निंग वॉकला जाणे जितके सोपे आहे, तितक्याच त्याबाबतीत अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःसाठी संकट निर्माण करू शकता. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेत असतानाच मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी जाणून घेऊयात.
आरोग्य तपासणी न करता सकाळी फिरायला जाणे :
हेल्थ चेकअपशिवाय मॉर्निंग वॉकसाठी जाणे खूप धोकादायक ठरू शकते. निरोगी आरोग्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणे महत्त्वाचे आहे, पण आरोग्य धोक्यात घालून मॉर्निंग वॉकला जाणे शहाणपणाचे नाही. जर तुम्हाला तुमच्या शरीराविषयी पूर्ण माहिती नसेल आणि हिवाळ्यात तुम्ही नियमित मॉर्निंग वॉकसाठी जात असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हृदयाची तपासणी महत्त्वाची:
मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी तुमचे हृदय निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हृदयाची समस्या असेल तर तुम्ही मॉर्निंग वॉकला जाणे टाळावे. दर 6 महिन्यांनी तुमची संपूर्ण शरीर तपासणी करून घ्या आणि त्याचा अहवाल डॉक्टरांना दाखवा. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सकाळी फिरायला जाण्याबाबत निर्णय घ्या.
तुम्हाला मधुमेह असला तरीही घ्या काळजी :
तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी जास्त चालणे महत्त्वाचे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे की तुम्ही चालताना कोणती खबरदारी घेता. मधुमेहाच्या रुग्णाने चालताना पुरेसे पाणी प्यावे.
अयोग्य कपडे घालणे :
फिरायला जाताना अयोग्य कपडे घालणे टाळा. चालताना कम्फर्टेबल आणि हवेशीर कपडे घाला. मात्र हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ते कपडे घालावे लागतील. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते.
विश्रांतीशिवाय फिरायला जाणे :
विश्रांतीशिवाय फिरायला जाणे टाळा. यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि थकवा येण्याची शक्यता वाढते.
अयोग्य शूज घालणे:
फिरायला जाताना अयोग्य शूज घालणे टाळा. चालताना आरामदायी आणि सुयोग्य शूज घाला. तुमचे शूज जितके कम्फर्टेबल असतील तितकेच तुम्ही चालण्याचा आनंद घेऊ शकाल.
हेही वाचा : Health Tips : घरातील या वस्तूंमुळेही होऊ शकतो कॅन्सर
Edited By – Tanvi Gundaye